१४५ कोटींच्या अपव्यवहार प्रकरणातील फरारी आरोपीला भाग्यनगरमधून (हैद्राबाद) अटक !

नागपूर येथील समता सहकारी अधिकोषातील अधिकारी, कर्मचारी, अधिकोषांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांनी बनावट कर्जप्रकरणे सादर करून १४५ कोटी ६० लाख रुपयांचा अपव्यवहार केला होता.

शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उंचगाव येथे सानुग्रह अनुदान वाटप !

उंचगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने ३०० जणांना ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी अशा शासनाच्या..

अन्वेषणातील नवीन गोष्टी हा जामीन रहित होण्याचा निकष असू शकत नाही हे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

‘सरकारी पक्षाच्या वतीने डॉ. तावडे यांचा जामीन रहित करण्यासाठी केलेले आवेदन न्यायाधिशांनी नाकारावे’, असा युक्तीवाद मुंबई येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला.

काँग्रेसीकरणामुळे भारताची ५ दशके वाया गेली ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतासमवेत स्वातंत्र्य झालेले कितीतरी देश पुढे गेले. भारतीय कुठेही अल्प नव्हते; मात्र काँग्रेसने भारतियांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्लानुसार काँग्रेस विसर्जित केली असती, तर भारत ५ पट पुढे गेला असता.

एकमेकांकडे बघण्याच्या किरकोळ कारणावरून पुणे येथे ६ जणांकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या !

किरकोळ हत्या कारणावरून होणे, हे तरुणांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचे द्योतक आहे.

सांगली येथील श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून ३ अनधिकृत ‘कॅफें’ची तोडफोड !

  (या अनधिकृत कॅफेंविषयी पोलीस-प्रशासनाला माहिती नाही कि ते जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत आहे ?, हे जनतेला कळले पाहिजे ! – संपादक)

Tuljabhavanidevi Temple Donation Scam : न्यायालयाने आदेश देऊनही तात्काळ गुन्हे न नोंदवल्यास प्रशासनाविरुद्ध अवमान याचिका प्रविष्ट करणार ! – हिंदूंची चेतावणी

. . . अशा महत्त्वाच्या मागण्या आम्ही शासनाकडे केल्या आहेत.’’ याउपरही प्रशासनाने कारवाई करण्यास विलंब केला, तर आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अवमान याचिका प्रविष्ट करावी लागेल, अशी चेतावणीही अधिवक्ता (पू.) कुलकर्णी यांनी दिली.

वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारकांना फसवणार्‍या धर्मांधाला अटक !

लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र आघाडीवर असतात !

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील अवैध होर्डिंग्ज हटवण्याचा आयुक्त शुभम गुप्ता यांचा आदेश !

आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले की, राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार १५ मे या दिवशी प्रशासनाधिकार्‍यांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून प्रत्येक होर्डिंगची पडताळणी केली जाईल.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी होण्याची शक्यता !

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या सर्वच प्रकरणाची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी होण्याची शक्यता आहे.