शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना उंचगाव येथे सानुग्रह अनुदान वाटप !

विविध शासकीय योजनांमधील लाभार्थ्यांना अनुदान वाटप करतांना श्री. राजू यादव (वृद्ध महिलेस साहाय्य देतांना)

कोल्हापूर – उंचगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने ३०० जणांना ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी अशा शासनाच्या विविध योजनांद्वारे देणारे सानुग्रह अनुदान देण्यात आले. ७ लाख रुपयांच्या या रकमेचे वाटप मंगेश्वर मंदिर येथे झालेल्या शिबिराद्वारे करण्यात आले. या वेळी अजित चव्हाण, आबा जाधव, मिलींद  प्रभावळकर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी सुनील केसरकर आदी उपस्थित होते.

या संदर्भात श्री. राजू यादव म्हणाले, ‘‘या सर्व नागरिकांना कोल्हापूर येथील मार्केट शाखेतील अधिकोषात सानुग्रह अनुदान देण्यात येते. हे सर्व ज्येष्ठ नागरिक असून सध्या असलेल्या कडक उन्हामुळे त्यांना कोल्हापूर शहर येथे जाण्या-येण्याचा त्रास होतो. त्यामुळे आम्ही गेल्या ५ वर्षांपासून ‘बँक आपल्या दारी’ हा उपक्रम राबवत आहोत. यामुळे अनेक गरीब, निराधार नागरिकांना साहाय्य होते.’’