सातारा, १६ मे (वार्ता.) – येथील शोएब अश्फाक शेख हा वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारकांना कोषागार (ट्रेझरी) कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांची आर्थिक फसवणूक करत होता. मुख्य म्हणजे तो हिंदु नावाने संपर्क करत होता. शोएब शेख याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. (धर्मांध हे हिंदु नाव धारण करून हिंदु मुलींना लव्ह जिहादमध्ये फसवतात. आता ते हिंदु नाव धारण करून अन्य लोकांनाही फसवत आहेत, हे लक्षात येते. धर्मांधांच्या या षड्यंत्राला उघड करण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – संपादक)
१३ मे या दिवशी शिवम चौगुले या व्यक्तीने सातारा येथील कोषागार कार्यालयातून सतीश ज्ञानदेव चोरगे यांना संपर्क केला. ‘कोषागार कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून ‘निवृत्तीवेतनधारकांना फरकाचे पैसे मिळणार आहेत, त्यासाठी वाढवून आलेल्या निवृत्तीवेतनाचे पैसे अगोदर भरा’, असे सतीश चोरगे यांना सांगितले. चोरगे यांना हे खरे वाटल्यामुळे चोरगे आणि त्यांचे सहकारी यांनी ७१ सहस्र ९०० रुपये ऑनलाईन पद्धतीने भरले. पैसे भरल्यानंतर सतीश चोरगे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. चोरगे यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास चालू केला. भ्रमणभाष क्रमांक तपासल्यानंतर शोएब अश्फाक शेख याला जिल्हा रुग्णालय परिसरातून पोलिसांनी कह्यात घेतले. शोएब शेख हाच शिवम चौगुले असे नाव सांगून निवृत्तीवेतनधारकांची फसवणूक करत असल्याचे पोलीस चौकशीमध्ये निष्पन्न झाले. शोएब याला अटक करण्यात आली असून अशा प्रकारची आणखी कुणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र आघाडीवर असतात ! |