हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींकडून ओणम् साजरा केला जात असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून होत आहे प्रसारित !

मुसलमानांनी हिंदूंच्या सणांमध्ये सहभाग घेतल्यावर किंवा हिंदूंनी मुसलमानांच्या सणांमध्ये सहभाग घेतल्यावर त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमे देण्यासाठी पुष्कळच उत्साही असतात; मात्र जेव्हा हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमणे केली जातात, तेव्हा मात्र ही प्रसारमाध्यमे या बातम्या टाळतात.

चित्रपटातील तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखण्याचा आरोप करत प्रसंग गाळण्याचा केरळ चित्रपट मंडळाचा आदेश ! – चित्रपट दिग्दर्शक रामसिम्हन्

केरळच्या साम्यवादी आघाडी सरकारच्या अखत्यारीत असलेले चित्रपट मंडळ याहून वेगळे काय करणार ? जो इतिहास आहे तो जगासमोर आलेलाच आहे, तो आता चित्रपटातून येऊ नये म्हणून आटापिटा करणारे केरळ सरकार किती धर्मांधप्रेमी आणि हिंदुविरोधी आहे, हे लक्षात घ्या !

स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर असणारी आय.एन्.एस्. विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका नौदलाकडे सुपुर्द

आत्मनिर्भर भारताचे अद्वितीय प्रतिबिंब असलेली आय.एन्.एस्. विक्रांत युद्धनौका विश्‍वक्षितीजावर भारताला बळकट करणार्‍या ध्येयाचा हुंकार !

अल्पवयीन मुलीवर अनेक वेळा बलात्कार करणार्‍या ख्रिस्ती पाद्र्याला जन्मठेप !

जर एखाद्या साधूवर असे खोटे आरोप जरी झाले असते, तर एव्हाना निधर्मीवाद्यांनी हिंदु धर्मावरच चिखलफेक करण्यास आरंभ केला असता ! प्रसारमाध्यमांनी आकाशपाताळ एक करून हिंदु संतांवर टीका केली असती ! आता शिक्षा करण्यात आलेला ख्रिस्ती पाद्री असल्याने सर्वत्र शांतता आहे.

अमली पदार्थ सेवन करणार्‍या चालकांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणार्‍यांच्या जिविताला धोका ! – केरळ उच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालयाने प्रशासनाला अमली पदार्थांचे सेवन करणार्‍या बसचालकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा चालकांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणार्‍या सर्वसाधारण समाजाचा जीव धोक्यात येतो.

मुला-मुलींना वर्गात एकत्र बसवल्याने अराजकता निर्माण होते ! – केरळचे हिंदुत्वनिष्ठ नेते वेल्लापेल्ली नटेसन्

श्री. नटेसन पुढे म्हणाले की, बहुतेक हिंदु महाविद्यालयांमध्ये अशी व्यवस्था पहायला मिळते. स्वत:ला धर्मनिरपेक्ष सरकार म्हणवणारे साम्यवादी सरकार धार्मिक दबावाला बळी पडत आहे आणि आपल्या निर्णयांवर ठाम रहात नाही, हे दुर्दैवी आहे. 

केरळमधील अवैध धार्मिक स्थळे बंद करा !  

न्यायालयाने म्हटले की, कुराणमध्ये मुसलमान समाजासाठी मशिदींचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे; पण ‘प्रत्येक रस्त्याला आणि चौकात मशीद असायला हवी’, असे कुराणमध्ये म्हटलेले नाही. ‘प्रत्येक मुसलमानाच्या घराजवळ मशीद असावी’ असे हदीस किंवा कुराण यांत म्हटलेले नाही.

(म्हणे) ‘मोपला नरसंहार हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गौरवशाली अध्याय !’ – केरळ विधानसभा सभापतींचे हिंदुविरोधी वक्तव्य

साम्यवादी सत्तेत असलेल्या केरळच्या सभापतींकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ?

न्यायालय मुसलमान पुरुषांना घटस्फोट आणि बहुपत्नीत्व यांपासून रोखू शकत नाही ! – केरळ उच्च न्यायालय

न्यायव्यवस्थेचे हात राज्यघटनेला बांधलेले असल्याने त्या पलीकडे जाऊन ती काही करू शकत नाही. यासाठी आता केंद्र सरकारनेच समान नागरी कायदा आणून सर्वांना समान न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !

म. गांधी यांच्या प्रतिमेच्या विटंबनेच्या प्रकरणी काँग्रेसच्याच ४ कार्यकर्त्यांना अटक !

स्वतःच्या कार्यकर्त्यांवर गांधी यांच्या अहिंसावादी विचारांचा संस्कार करू न शकणारी काँग्रेस म्हणे देशाला आणि जगाला अहिंसा शिकवण्याचा प्रयत्न करते !