केरळमध्ये भाजपच्या २ कार्यकर्त्यांवर सशस्त्र आक्रमण !

भाजपच्या दिनेश आणि विष्णु या २ कार्यकर्त्यांवर सशस्त्र आक्रमण

पलक्कड (केरळ) – येथे भाजपच्या दिनेश आणि विष्णु या २ कार्यकर्त्यांवर सशस्त्र आक्रमण करण्यात आल्याचे वृत्त आहे. या वेळी विष्णु यांच्या आईने विष्णु यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता आरोपींनी आईलाही मारहाण केली.

घायाळ झाल्याने या तिघांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

माकपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून आरोपींना सोडवले ! – भाजपचा आरोप

केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी ट्वीट करून आरोप केला आहे की,  माकपच्या गुंडांनी पलक्कडमधील पोलीस ठाण्यावर आक्रमण करून भाजपच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण करणार्‍या आरोपींची सुटका केली.

गेल्या वर्षी याच भागात माकपच्या गुंडांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्ताची हत्या केली होती. केरळच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. आम्ही मूक प्रेक्षक म्हणून याकडे पहाणार नाही, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

संपादकीय भूमिका

साम्यवाद्यांच्या केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आहे का ? भाजपच्या राज्यात अशी घटना साम्यवाद्यांच्या संदर्भात घडली असती, तर साम्यवाद्यांनी देश डोक्यावर घेतला असता !