केरळमध्ये हिंदूंच्या विरोधानंतर मंदिराला दिलेला पाकच्या ध्वजासारखा रंग मंदिराच्या व्यवस्थापनाने पुसला !

प्रतिकात्मक चित्र

मलप्पुरम् (केरळ) – हिंदूंच्या विरोधानंतर मलप्पुरम्मधील अंगदीपुरम् येथील थिरुमंधमकुन्नू देवी मंदिराच्या भिंतींना दिलेला पाकिस्तानच्या ध्वजासारखाच हिरवा आणि पांढरा रंग मंदिराच्या व्यवस्थापनाने नुकताच पुसला. ‘हिंदु ऐक्यवेदी’ या संघटनेनेही चेतावणी दिली होती की, मंदिराचा रंग पुसला नाही, तर संघटनेचे कार्यकर्ते स्वत: तो पुसतील. हे मंदिर ‘मलबार देवस्वोम् मंडळा’च्या वतीने चालवले जाते. या मंडळावर साम्यवादी आणि नास्तिक यांचा प्रभाव आहे. पूरम् उत्सवापूर्वी मंदिराला ही रंगरंगोटी करण्यात आली होती.

मंदिराच्या उत्सव समितीत मुसलमान आणि ख्रिस्त्यांचा भरणा !

याहूनही चिंताजनक गोष्ट म्हणजे मंदिराच्या उत्सव समितीमध्ये सदस्य म्हणून मुसलमानांना नियुक्त करण्यात आले आहे. या समितीत पहिले नाव ‘मुस्लीम लीग’चे नेते तथा खासदार अब्दुल समद समदानी यांचे आहे. १४ सदस्यांपैकी ५ मुसलमान आहेत. या समितीचे अध्यक्ष मंजलमकुळी अली हे मुसलमान आहेत, तर उपाध्यक्ष जोस वर्गीस हे ख्रिस्ती आहेत. (कधी चर्च किंवा मशीद यांच्या समितीवर हिंदूंची अशी नियुक्ती  नियुक्ती केली जाते का ? – संपादक)

संपादकीय भुमिका

हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचाच हा परिणाम आहे !