राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांना मानवी बाँबने उडवून देऊ ! – धमकीचे पत्र

धमकी देणार्‍यासमवेत त्याच्या सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यासाठी साम्यवादी केरळमधील पोलीस प्रयत्न करतील का, यासंदर्भात शंकाच आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयानेच यामध्ये लक्ष घालून कठोर कारवाई केली पाहिजे !

प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांकडून विवाहाचा खर्च मिळवण्याचा अधिकार ! – केरळ उच्च न्यायालय

मग ती कोणत्याही धर्माची असो, असे केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी म्हटले आहे.

केरळमध्ये रेल्वेचा डबा पेटवून देणार्‍या शाहरूखचा आदर्श होता झाकीर नाईक !

शाहरूख सैफी सतत झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहायचा. सैफी अत्यंत कट्टरपंथी असून गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो केरळमध्ये आला होता.

काही न्यायमूर्ती आळशी असल्याने ते निकाल वेळेवर लिहित नाहीत !

काही न्यायमूर्ती आळशी आहेत. ते वेळेवर निर्णयही लिहित नाहीत. त्यांना निर्णय लिहिण्यासाठी अनेक वर्षे लागतात. काहींना तर कामही करता येत नाही.

केरळमध्ये भाजपच्या नेत्यांनी इस्टर संडेच्या दिवशी घेतल्या ख्रिस्ती धर्मगुरूंच्या भेटी !

त्यानुसार नेते मुरलीधरन् यांनी लॅटिन कॅथॉलिक आर्च डायोसीज मुख्यालयाला भेट दिली, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन् यांनी थालास्सेरी येथील बिशप हाऊसमध्ये जाऊन आर्चबिशप मार रेमीजियस पॉल इंचानानियिल यांची भेट घेतली.

संशयित शाहरुख सैफी याला रत्नागिरीतून अटक

२ एप्रिल या दिवशी कन्नूरला जाणार्‍या रेल्वेगाडीत एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. तिने प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ टाकून रेल्वेला आग लावली. यात ३ जणांचा मृत्यू झाला, तर ९ जण भाजले होते.

शाळेच्या उत्सवातील कार्यक्रमातील सादरीकरणात आतंकवाद्याला मुसलमान दाखवल्याने १० जण कह्यात !

पेरांबरा येथे राज्यस्तरीय शालेय उत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातील एका सादरीकरणात मुसलमानांना आतंकवादी दाखवण्यात आल्यावरून पोलिसांनी १० लोकांना कह्यात घेतले. यामध्ये ‘मल्ल्याळम् थिएट्रिकल हेरीटेज अँड आर्ट्स’ने (‘माथा’ने) एक संगीतमय सादरीकरण केले होते.

केरळमध्ये प्रवाशाने रेल्वेला लावलेल्या आगीमध्ये ३ प्रवाशांचा मृत्यू, तर ९ जण घायाळ

कोळीकोड येथे अलाप्पुझा-कन्नूर एक्झिटीव्ह एक्सप्रेसमध्ये झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने रेल्वे गाडीलाच आग लावल्याची घटना घडली. यात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ९ प्रवासी घायाळ झाले. ही घटना २ एप्रिलला रात्री घडली.

केरळमधील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद भरतन् यांचे निधन

गोविंद भरतन् हे ‘भारतीय वाक्य परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष होते. मंदिरांशी संबंधित अनेक खटले त्यांनी लढवले आहेत. हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित करण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते नेहमी सहभागी होत असत.

केरळ येथील थिरूमंधमकुन्नू भगवती मंदिराच्या समितीवर मुसलमानांच्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयात याचिका !

मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या प्रार्थनास्थळांवर कधी कुणा हिंदूची नियुक्ती झाल्याचे ऐकिवात आहे का ? मुळात हिंदूंच्या धर्माभिमानशून्यतेमुळेच अशा घटना घडतात, हे जाणा !