६ ऑक्टोबरपर्यंत ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ जागे होण्याची प्रतीक्षा करू ! – इस्रो
चंद्रयान-३चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवार उतरल्यानंतर १४ दिवस त्यांनी तेथील माहिती पाठवली. १४ दिवसांनी तेथे त्यापुढील १४ दिवसांसाठी सूर्य मावळल्याने अंधार झाला. या काळात येथे प्रचंड थंडी असते. त्यामुळे ‘विक्रम’ आणि ‘प्रज्ञान’ यांचे काम इस्रोकडून बंद करण्यात आले होते.