उदयनिधी, ए. राजा यांच्यानंतर आता अभिनेते प्रकाश राज यांचे विधान !
बेंगळुरू (कर्नाटक) – सनातन धर्म डेंग्यूच्या तापासारखा असून तो नष्ट केला पाहिजे, असे विधान अभिनेते प्रकाश राज यांनी केले. ते राज्यातील कलबुर्गी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. यापूर्वी तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनीही अशाच प्रकारचे विधान केले होते.
प्रकाश राज पुढे म्हणाले की,
१. डॉ. आंबेडकरांमुळे अस्पृश्यता संपली, तरी देशात अद्याप अस्पृश्यतेची मानसिकता शिल्लक आहे. (प्रकाश राज सनातनद्वेषाची मानसिकता जपत आहेत, ती ते कधी नष्ट करणार आहेत, हे त्यांनी आधी सांगावे ! – संपादक)
२. कर्नाटकमध्ये एका महिलेने मुसलमान बसवाहकाला त्याने घातलेली गोल टोपी काढण्यास सांगितले. उद्या त्याने माळ गळ्यात घातली, तर तुम्ही त्याला बसवाहकाच्या रूपात पहाणार कि भक्तीच्या रूपामध्ये ? उद्या असा बसचालक हनुमान टोपी घालेल आणि ‘बस सुखरूप राहूदे’ म्हणून प्रार्थनाही करील, अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
३. सर्वांनी त्यांच्या धर्माचे पालन केले पाहिजे. देशाला जिवंत ठेवायचे आहे ना ? समाजात सर्वांना रहायचे आहे. (एकीकडे असे म्हणायचे आणि दुसरीकडे सनातन धर्म नष्ट करण्याचे विधान करायचे,हा दुतोंडीपणा आहे ! – संपादक)
४. श्रीरानवमीच्या मिरवणुकीमध्ये १८ वर्षांचे तरुण हातात चाकू आणि तलवार घेऊन चालतात. हे पाहून मला खरच दुःख होते. त्यांनी रोजगार आणि त्यांची स्वप्ने यांच्याविषयी विचार केला पाहिजे. मला आश्चर्य वाटते की, त्यांचा बुद्धीभेद कुणी केला ? (हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींवरून आक्रमणे होतात, हिंदूंच्या हत्या केल्या जातात, जिहादी आतंकवादाद्वारे हिंदूंना ठार मारले जाते, यांविषयी प्रकाश राज यांना कधी दुःख कसे होत नाही ? मदरशांमध्ये मुसलमानांचा बुद्धीभेद करून त्यांना आतंकवादी बनवले जाते, असे उघड झालेले असतांना त्याविषयी प्रकाश राज कधी का बोलत नाहीत ? – संपादक)
‘सनातन डेंगू की तरह इसका खात्मा जरूरी’: प्रकाश राज ने उदयनिधि के हिन्दू विरोधी बयानों का किया समर्थन, कलबुर्गी में सड़क पर उतरे लोग#PrakashRaj #Kalburagi #karnataka #SanatanaDharmahttps://t.co/0DeRP32o3d
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 11, 2023
प्रकाश राज यांच्या कार्यक्रमाला हिंदु संघटनांकडून विरोध !
या कार्यक्रमाच्या पूर्वी स्थानिक हिंदु द्रोहीनांनी प्रकाश राज यांच्या कार्यक्रमाला विरोध केला. संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून आणि काळे झेंडे फडकावून प्रकाश राज यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. पोलिसांनी नंतर या कार्यकर्त्यांना कह्यात घेतले. कार्यकर्त्यांनी तत्पूर्वी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन ‘प्रकाश राज यांना कलबुर्गीमध्ये प्रवेश देऊ नये’, अशी मागणी केली.
संपादकीय भूमिका
|