|
बेंगळुरू (कर्नाटक) – ‘आज तक’ वृत्तवाहिनीचे पत्रकार सुधीर चौधरी यांच्या विरोधात कथित सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कर्नाटक अल्पसंख्यांक विकास विभागाने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तसेच यात वाहिनीचे मुख्य संपादक आणि आयोजक यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ‘आज तक’ वाहिनीच्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे पत्रकार सुधीर चौधरी कर्नाटक सरकारच्या एका योजनेच्या (स्वावलंबी सारथी योजनेच्या) अनुदानावरून माहिती देत होते. यात दावा करण्यात आला की, या योजनेच्या अंतर्गत मिळणारे अनुदान केवळ अल्पसंख्यांकांनाच (मुसलमानांनाच) मिळत आहे, हिंदूंना नाही.
या कार्यक्रमात कर्नाटकमध्ये गरीब हिंदूंवर या योजनेच्या अंतर्गत अन्याय केला जात आहे, असे म्हटले होते.
Case filed against Aaj Tak’s Sudhir Chaudhary for misinformation #SudhirChaudhary #Karnataka #Aajtak #misinformation #Karnatakascheme pic.twitter.com/QAwzaOfeFf
— TheNewsMinute (@thenewsminute) September 13, 2023
(म्हणे) ‘सूत्रसंचालकाने जाणीवपूर्वक सरकारी योजनेविषयी चुकीची माहिती पसरवली !’ – मंत्री प्रियांक खर्गे यांचा आरोप
या संदर्भात कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी म्हटले की, ‘आज तक’च्या सूत्रसंचालकाने जाणीवपूर्वक सरकारी योजनांविषयी चुकीची माहिती पसरवली आहे. चुकीची माहिती पसरवण्याचा प्रारंभ भाजपच्या खासदारांनी केला होता आणि प्रसारमाध्यमांकडून त्याला प्रोत्साहन दिले जात आहे. हे हेतूपुरस्सर केले जात आहे. सरकार यावर कायदेशीर कारवाई करील.
‘स्वावलंबी सारथी योजने’मध्ये हिंदु धर्मियांचा समावेश का नाही ?’ या प्रश्नावरून माझ्यावर गुन्हा ! – सुधीर चौधरी
सुधीर चौधरी यांनी यावर ट्वीट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडून माझ्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. माझ्या प्रश्नाचे उत्तर म्हणून माझ्यावर गुन्हा नोंदवला आहे का ? आणि तोही अजामीनपात्र ! म्हणजे मला अटक करण्याची पूर्ण सिद्धता करण्यात आली आहे. माझा प्रश्न होता की, ‘स्वावलंबी सारथी योजने’मध्ये हिंदु धर्मियांचा समावेश का नाही ? या लढाईसाठी मी सिद्ध आहे. आता न्यायालयातच भेटूया !
काय आहे स्वावलंबी सारथी योजना ?‘कर्नाटक स्वावलंबी सारथी योजने’च्या अंतर्गत राज्यातील अल्पसंख्यांक आणि अनुसूचित जाती-जमाती समाजातील बेरोजगार युवकांना चारचाकी वाहने विकत घेण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. यात मुसलमान, ख्रिस्ती, जैन, शीख, बौद्ध आणि पारसी यांना याचा लाभ मिळणार आहे. (काँग्रेसला निवडून देऊन सत्तेवर बसवणार्या कर्नाटकातील हिंदूंना ही योजना मान्य आहे का ? – संपादक) |
संपादकीय भूमिका
|