ममता बॅनर्जी यांच्यानंतर ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांचा हिंदुद्वेष चालूच !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कपाळावर टिळा लावून घेण्यास नकार दिल्याचा एक व्हिडिओ भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ट्वीट केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही स्वागताच्या वेळी टिळा लावून घेण्यास नकार दिला होता.
सिद्धारमैया ने टीका लगाने से किया इनकार तो BJP ने बोला हमला, कहा- ‘टोपी लगाना धर्मनिरपेक्ष है लेकिन…’#karnatakacm #siddaramaiahtilak #siddaramaiah #mamatabanerjee #bjp #BJPspokespersonshahzadpoonawala #shahzadpoonawala #udhayanidhistalin #sanatandharma…
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) September 17, 2023
१. भाग्यनगर येथील ‘इंडिया’ आघाडीच्या कार्य समितीच्या बैठकीसाठी येथील एका सभागृहात उपस्थित रहातांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रवेशद्वारावर स्वागत करण्यात आले. तेव्हा पारंपरिक वेश परिधान करून आरतीचे ताट घेऊन उभ्या असणार्या एका महिलेने सिद्धरामय्या यांना टिळा लावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी हात दाखूवन टिळा लावून घेण्यास नकार दिला, तसेच आरती ओवाळून घेण्याचेही टाळले. या वेळी सिद्धरामय्या यांच्या समवेत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह हेही उपस्थित होते.
२. यावर भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता सिद्धरामय्या यांनी टिळा लावण्यास नकार दिला आहे. गोल टोपी घालणे योग्य आणि टिळा लावणे योग्य नाही ? या आघाडीने मुंबईतील बैठकीतच हिंदु आणि सनातन धर्म यांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतला. द्रमुकचे उदयनिधी स्टॅलिन ते ए. राजा, काँग्रेसचे जी. परमेश्वर ते प्रियांक खरगे आणि राष्ट्रीय जनता दल ते समाजवादी पक्ष यांच्यापर्यंत ‘हिंदूंच्या श्रद्धांवर आघात करा आणि मते मिळवा’, असेच धोरण आखले आहे.
संपादकीय भूमिका
|