गोव्यात ‘जनता कर्फ्यू’ च्या काळात घडलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

गोव्यात २४ मार्च या दिवशी मध्यरात्रीपर्यंत ‘जनता कर्र्फ्यू’ लागू होता आणि यानंतर २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. २४ मार्च या दिवशी ‘जनता कर्फ्यू’ च्या काळात राज्यात घडलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी पुढे देत आहे.

गोव्यात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू

गोव्यात २४ मार्च या दिवशी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे ‘फेसबूक’च्या माध्यमातून लाईव्ह करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत केली.