धर्मांधाकडून हिंदु मुलीला विवाहाचे आमीष दाखवून ५ वर्षे लैंगिक अत्याचार

  • गोव्यात कुळे, धारबांदोडा येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघडकीस

  • पोलीस तक्रार मागे घेण्यास १ लाख रुपयांचे आमीष

  • धर्मांधाच्या कुटुंबियांनी धर्म वेगळा असल्याने दिला विवाहास नकार

मुसलमान कुटुंबीय हिंदु सुनेचे डोहाळ जेवण करत आहे, असे विज्ञापन प्रसिद्ध करणारे तनिष्क ज्वेलरीवाल्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? त्यांनी काल्पनिक संकल्पनेवर विज्ञापन करण्यापेक्षा अशा प्रकारे धर्म वेगळे म्हणून विवाहास नकार देणार्‍या धर्मांध कुटुंबियांचे वस्तूनिष्ठ विज्ञापन दाखवावे !

मडगाव, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – कुळे, धारबांदोडा, गोवा येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उघडकीस आले आहे. कुळे, धारबांदोडा येथील रेल्वे वसाहतीत रहाणारा संशयित नवाझ साब देसाई याने दहावी इयत्तेत शिकणार्‍या एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सलग ५ वर्षे विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित युवतीने तिची फसवणूक झाल्याची आणि ५ वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अन् कुळे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे

२५ नोव्हेंबर या दिवशी केली आहे. ‘लव्ह जिहाद’ची शिकार झाल्यामुळे संशयिताच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद करण्याची मागणी पीडित युवतीने तक्रारीत केली आहे. (यातून हिंदु मुलींचे लव्ह जिहादविषयी प्रबोधन करणे किती महत्त्वाचे आहे आणि लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायद्याची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! प्रेमाच्या नावाखाली धर्मांध कसे फसवतात हे आतातरी गोव्यातील हिंदु मुलींनी लक्षात घेणे आवश्यक आहे ! – संपादक) पोलिसांत तक्रार प्रविष्ट केल्यावर प्रकरण मिटवण्यासाठी १ लाख रुपयांचे आमीष दाखवण्यात आल्याचे पीडित युवतीचे म्हणणे आहे. पीडित युवतीने तक्रारीत पुढील सूत्रे नमूद केली आहेत.

१. संशयित नवाझ साब देसाई हा दूधसागर धबधब्यावर जाणार्‍या एका जीपवर चालक म्हणून काम करतो. वर्ष २०१५ मध्ये पीडित युवती कुळे येथील एका विद्यालयामध्ये १० इयत्तेत शिकतांना तिचा संशयित नवाझ साब देसाई याच्याशी प्रथम संपर्क आला. शाळेत जातांना पाठलाग करणे, विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर किंवा घरच्या वाटेवर पीडित युवतीला भेटण्यासाठी प्रतीक्षा करणे आदी माध्यमांतून संशयिताने पीडित युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर दोघांनीही एकमेकांना त्यांचा भ्रमणभाष क्रमांक दिला आणि दोघेही भ्रमणभाषवर ‘चॅटींग’ करू लागले. यानंतर दोघेही ‘डेटींग’ (एकमेकांना वेळ ठरवून भेटणे) करू लागले आणि याची दोन्ही कुटुंबियांना कल्पना होती.

२. जानेवारी २०१६ पासून संशयिताने प्रेमाच्या आहारी गेलेल्या पीडित युवतीवर निर्जन स्थळी नेऊन लैंगिक अत्याचार करण्यास प्रारंभ केला. हे प्रकार पुढे सातत्याने चालूच राहिले. विवाह करणार असल्याची हमी दिल्याने पीडित युवतीने लैंगिक अत्याचाराच्या विरोधात काहीच आवाज उठवला नाही.

३. जून २०१६ मध्ये पीडित युवती कुडचडे येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिकू लागली. संशयित नवाझ साब देसाई मुद्दामहून कुळे येथून रेल्वेने कुडचडे येथे पीडित युवतीला भेटण्यासाठी येऊ लागला. या वेळी कधीकधी संशयित नवाझ साब देसाई स्वत:ची दुचाकी घेऊन पीडित युवतीला तिच्या घरी ने-आण करू लागला. या काळातही संशयित नवाझ साब देसाई युवतीवर लैंगिक अत्याचार करत असे. वर्ष २०१७ पासून निर्जन स्थळी नेऊन विवाह करण्याची हमी देऊन पीडित युवतीशी शारीरिक संबंध ठेवले.

४. वर्ष २०१८ मध्ये संशयित नवाझ साब देसाई आणि पीडित युवती कोलवा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एक रात्र निवासासाठी थांबले. या हॉटेलमध्ये संशयित नवाझ साब देसाई याने पीडित युवतीच्या कपाळाला कुंकू लावून आणि गळ्यात मंगळसूत्र घालून हिंदु रितीरिवाजानुसार पीडित युवतीशी विवाह केल्याचा बहाणा करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले; परंतु खर्‍या अर्थाने विवाह झाला नव्हता.

५. जुलै २०१९ मध्ये संशयित नवाझ साब देसाई याने पीडित युवतीला मंगेशी येथील श्री मंगेश मंदिरात नेले आणि पुन्हा  युवतीच्या कपाळावर कुंकू लावून आणि गळ्यात मंगळसूत्र घातले.

६. त्यानंतर संशयित नवाझ साब देसाई याची विवाह करण्याची सिद्धता नसल्याचे लक्षात आल्यावर पीडित युवतीने संशयिताच्या कुटुंबियांची भेट घेतली. या वेळी संशयित नवाझ साब देसाई याचे कुटुंबीय पीडित युवतीला म्हणाले, ‘‘तुम्हा दोघांचे धर्म निरनिराळे असल्याने विवाह करण्याची आमची सिद्धता नाही.’’

७. सप्टेंबर २०२० मध्ये पीडित युवतीला लैंगिक संबंधांमुळे काही शारीरिक समस्या निर्माण झाल्या. यानंतर संशयित नवाझ साब देसाई याने पीडित युवतीला वैद्यकीय तपासणीसाठी नेले.

८. सप्टेंबर २०२० च्या शेवटच्या आठवड्यात नवाझ साब देसाई याने पीडित युवतीशी त्याचा पवित्रा अचानकपणे पालटला. संशयित नवाझ साब देसाई पीडित युवतीला भ्रमणभाषवरून शिवीगाळ करून छळू लागला. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पीडित युवती ३ ऑक्टोबर २०२० या दिवशी संशयित नवाझ साब देसाई याच्या घरी गेली असता संशयित नवाझ साब देसाई याच्या कुटुंबियांनी घराबाहेर येऊन पीडित युवतीला शिवीगाळ करण्यास प्रारंभ केला. संशयित नवाझ साब देसाई याच्या कुटुंबातील सदस्यांनी पीडित युवतीचे म्हणणे ऐकून न घेता तिला मारहाण करण्यास प्रारंभ केला. या वेळी पीडित युवतीने ‘१००’ क्रमांकावर संपर्क करून तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता नेटवर्कच्या अडचणीमुळे ती तक्रार करू शकली नाही; मात्र याच वेळी संशयित नवाझ साब देसाई याच्या कुटुंबातील एका सदस्याने कुळे पोलीस ठाणे गाठून पीडित युवतीच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलीस घटनास्थळी आले आणि पोलिसांनी पीडित युवती अन् संशयित नवाझ साब देसाई या दोघांनाही पोलीस ठाण्यात नेले. या वेळी संशयित नवाझ साब देसाई पीडित युवतीला म्हणाला, ‘‘आपल्यामधील कोणतीच माहिती पोलिसांना देऊ नको. मी तुझ्याशी डिसेंबर २०२० मध्ये विवाह करीन.’’

९. कुळे पोलिसांनी ४ ऑक्टोबर २०२० या दिवशी पीडित युवती आणि संशयित नवाझ साब देसाई यांच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावले. पोलिसांनी दोन्ही पक्षांकडून प्रकरण मिटवण्याविषयी लेखी स्वरूपात लिहून घेतले. या वेळी संशयित नवाझ साब देसाई याने पीडित युवतीला पुन्हा विवाहाचे आमीष दाखवले आणि त्याने स्वत:च्या व्हॉटसअ‍ॅपवरील पीडित युवतीसमवेत पूर्वी झालेले सर्व संभाषण पुसून टाकले. यामुळे पुरावा मिटवून टाकण्यात आला.

१०. संशयित नवाझ साब देसाई याच्यावर विश्‍वास ठेवून पीडित युवतीने पोलिसांत कोणतीही तक्रार केली नाही; मात्र यानंतर पुन्हा संशयित नवाझ साब देसाई याचा पीडित युवतीशी पवित्रा पालटला. संशयित नवाझ साब देसाई याने पुन्हा पीडित युवतीचा छळ करण्यास प्रारंभ केला. संशयित नवाझ साब देसाई याने त्यानंतर पीडित युवतीशी संपर्क तोडला आणि स्वत:चा भ्रमणभाष बंद ठेवला.

११. यानंतर पीडित युवतीला ती ‘लव्ह जिहाद’ची शिकार झाल्याचे लक्षात आले. स्वत:चा केवळ शारीरिक भोगासाठी वापर झाल्याचे तिच्या लक्षात आले. या काळात संशयिताने पीडित युवतीला इतरांशी बोलण्यास दिले नाही आणि पुढील शिक्षणही घेण्यास दिले नाही. त्यामुळे स्वत:चे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याने पीडित युवती प्रचंड तणावाखाली आली. यामुळे तिने ८ नोव्हेंबर २०२० या दिवशी घरीच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; मात्र ती वाचली.

१२. यानंतर पीडित युवतीने कुळे पोलीस ठाण्यात संशयित नवाझ साब देसाई याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. या वेळी संशयित नवाझ साब देसाई आणि त्याच्या कुटुंबियांनी प्रकरण मिटवण्यासाठी प्रारंभी ५० सहस्र रुपये आणि नंतर ती स्वीकारण्यास सिद्ध नसल्याने १ लाख रुपयांचे आमीष दाखवले.

१३. हे प्रकरण कुडचडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने कुळे पोलिसांनी याविषयी पीडित युवतीला तक्रार मागे घेऊन ती कुडचडे पोलीस ठाण्यात प्रविष्ट करण्याचा सल्ला दिला. पीडित युवतीने यानंतर कुडचडे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या वेळीही पुन्हा संशयित नवाझ साब देसाई याच्या कुटुंबियाने तक्रार मागे घेऊन प्रकरण मिटवण्यासाठी १ लाख रुपयांचे आमीष दाखवले. कुडचडे पोलिसांनी पीडित युवतीला पुन्हा कुळे पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला.

१४. पीडित युवती २३ नोव्हेंबर २०२० या दिवशी मानसिक धक्क्यापासून कशीबशी सावरली आणि तिला मागील ५ वर्षांत तिच्यावर झालेले लैंगिक अत्याचार ठिकाणांसह आठवले. त्यानंतर पीडित युवतीने लैंगिक अत्याचार केलेल्या सर्व ठिकाणांचा उल्लेख आणि त्यासंबंधीची छायाचित्रे जोडून संशयित नवाझ साब देसाई याच्या विरोधात नव्याने तक्रार प्रविष्ट केली.