दिवाळखोर म्हापसा अर्बन बँकेच्या १५ शाखा १ जानेवारी २०२१पासून बंद

पणजी, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यातील १५ शाखा आणि एक अतिरिक्त कक्ष (काऊंटर) १ जानेवारी २०२१ पासून बंद करणार असल्याची घोषणा म्हापसा अर्बन बँकच्या व्यवस्थापनाने केली आहे. बँकेच्या म्हापसा, हणजूण, शिवोली, मांद्रे, हळदोणा, ताळगाव, सांताक्रूझ, पेन्ह-द-फ्रान्स, उसगाव-तिस्क, कुडचडे, सांगे, मडगाव, बाणावली, कासावली आदी ठिकाणी भाड्याच्या जागेत शाखा चालू होत्या आणि थिवी येथे अतिरिक्त कक्ष चालू होता.

(बँक दिवाळखोर झाली; पण बँकेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापक दिवाळखोर झाले कि श्रीमंत झाले ? याचीही चौकशी करावी ! – संपादक)