कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण घटले
पणजी, २७ नोव्हेंबर (वार्ता.) – गोव्यात कोरोनामुळे गेल्या २४ घंट्यांत १ मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ सहस्र ६४५ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी १५० जण कोरोनाबाधित आढळले. हे प्रमाण ५.६७ टक्के आहे. दिवसभरात १५२ रुग्ण बरे झाले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या १ सहस्र ३१३ झाली आहे.