देहलीतील भाजपच्या नेत्याकडून पुजार्‍यांना पगार देण्याची आप सरकारकडे मागणी

देहलीतील आम आदमी पक्षाचे सरकार हिंदूंशी भेदभाव करते. मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारांच्या ग्रंथी यांनाही इमाम आणि मुएझिन यांच्याप्रमाणे पगार मिळायला हवा.

आधारकार्डप्रमाणेच जन्म प्रमाणपत्रही अनिवार्य होणार

शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश, मतदारसूचीत समावेश, केंद्र आणि राज्य सरकारी नोकर्‍यांमध्ये नियुक्ती, वाहन अनुज्ञप्ती आणि पासपोर्ट मिळवणे, यांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी जन्म प्रमाणपत्र अनिवार्य कागदपत्र बनवण्याचे काम सध्या चालू आहे.

एन्.डी.टी.व्ही.’चे प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांचे प्रवर्तक पदाचे त्यागपत्र

‘एन्.डी.टी.व्ही.’ या वृत्तवाहिनीचे संस्थापक आणि प्रवर्तक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक आस्थापन ‘आर्.आर्.पी.आर्. होल्डिंग्ज’च्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचे त्यागपत्र दिले. अदानी समूहाला आस्थापनाच्या मालकीचा काही भाग विकला आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीमुळे झालेल्या मृत्यूंसाठी केंद्र सरकार उत्तरदायी नाही !

केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

व्हॅटिकन सिटी, ग्रीनलँड, मोनाको या देशांत एकही मुसलमान नाही !

या देशांचे सुदैव की, तेथे भारतातील कथित धर्मनिरपेक्षतावादी नाहीत. अन्यथा त्यांनी तेथील शासनांना ‘मुसलमानविरोधी’ म्हणत मुसलमानी वस्त्या वसवण्यासाठी आकाशपाताळ एक केले असते !

देहली येथे आफताबला ठार मारण्याचा प्रयत्न

पोलिसांच्या व्हॅनमधून आफताब याला नेण्यात येत होते, तेव्हाही व्हॅन थांबवून आतमध्ये असणार्‍या अफताबला ठार मारण्यासाठी तिघेजण पोचले होते. त्यांच्या हातात तलवारी होत्या.

बलपूर्वक धर्मांतराच्या विरोधात राज्यांनी कायदे बनवावेत !

केंद्रशासनाचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र !

येत्या प्रजासत्ताकदिनाला इजिप्तचे राष्ट्रपती असणार प्रमुख पाहुणे !

गेल्या मासामध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी इजिप्तच्या दौर्‍याच्या वेळी राष्ट्रपती अब्देल सिसी यांची भेट घेतली होती.

‘जी २०’ देशांच्या प्रतिनिधी मंडळाची अंदमानातील ‘सेल्युलर’ कारागृहाला भेट !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आलेल्या या नरकरूपी कारागृहाला एकदाही भेट न देता केवळ त्यांच्यावर चिखलफेक करण्यात धन्यता मानणारे काँग्रेसी, साम्यवादी, पुरोगामी आदी विदेशी लोकांकडून तरी काही शिकतील का ?

देशी मिठाई आणि नमकीन यांच्या पॅकबंद पदार्थांवर आरोग्याला हानीकारक असल्याचे लेबल लागणार !

साखर आणि मीठ यांची मात्रा अधिक असल्यास अशा खाद्यपदार्थांना आरोग्यासाठी हानीकारक ठरवले जाणार आहे. पॅकबंद खाद्यपदार्थांच्या डब्यावर अशा प्रकारचे लेबल लावण्यात येणार आहे.