‘रॅनबॅक्सी’ आस्थापनाच्या माजी प्रवर्तकांना अटक

ऑक्टोबर मासात देहली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मलविंदर यांच्यासह ४ जणांना अटक केली होती. डिसेंबर २०१८ मध्ये ‘आर्एफ्एल’ने देहली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार प्रविष्ट केली होती.

काँग्रेसचे पी. चिदंबरम् यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

३०५ कोटी रुपयांच्या ‘आयएन्एक्स् मिडिया’ घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अटकेत असलेले काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे.

(म्हणे) ‘अयोध्येत मशिदीसाठी पर्यायी जागा स्वीकारणार नाही !’ – जमीयत उलेमा-ए-हिंद

पैसा असो किंवा जमीन, मशिदीला पर्याय म्हणून काहीही स्वीकारणार नाही. मशिदीसाठी पर्यायी ५ एकर जागा स्वीकारायची नाही, असा निर्णय जमीयत उलेमा-ए-हिंदने येथे झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेतला.

शबरीमला मंदिरातील सर्व वयोगटांतील महिलांच्या प्रवेशाचे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे सुपुर्द !

शबरीमला देवस्थानात स्त्रियांना प्रवेशबंदी : सर्वोच्च न्यायालयात १४ नोव्हेंबरला झालेल्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणीवर सरन्यायाधिशांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायाधिशांच्या घटनापिठाने हा निर्णय घेतला. यातील ३ न्यायाधिशांच्या बहुमताने हे प्रकरण ७ न्यायाधिशांच्या खंडपिठाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला.

पाकिस्तानने काश्मिरी लोकांना भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षण दिले ! – परवेझ मुशर्रफ

आतापर्यंत भारतात होणार्‍या आतंकवादी कारवायांच्या मागे पाक आहे, हा भारताचा दावा पाक सातत्याने फेटाळत होता; मात्र आता स्वतः पाक सैन्याचे माजी सैन्यप्रमुखच हे मान्य करत आहेत, यातून पाकचा खरा तोंडवळा जगासमोर उघड झाला आहे !

‘राफेल’ खरेदी प्रकरणातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

राफेल या लढाऊ विमानाच्या कथित अपव्यवहाराच्या चौकशीची आवश्यकता नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने राफेल विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.

राममंदिरासाठी दुसरा न्यास स्थापण्याची आवश्यकता नाही ! – महंत नृत्यगोपाल दास

राममंदिर उभारण्यासाठी रामजन्मभूमी न्यास आधीच अस्तित्वात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला अनुसरून केंद्र सरकारने दुसरा न्यास (ट्रस्ट) स्थापण्याची आवश्यकता नाही.

जे.एन्.यू.मध्ये राष्ट्रघातकी साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीची तोडफोड

अशा विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना कारागृहात टाकण्यासह त्यांना विश्‍वविद्यालयातूनही काढले पाहिजे ! साम्यवादी विचारसरणीने देशाचा आणि हिंदु धर्माचा घात करण्याच्या व्यतिरिक्त अन्य काहीही केलेले नाही. अशी विचारसरणी देशातून कायमची हद्दपार करण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

भारत ‘आर्सीईपी’ करारामधून बाहेर राहिल्यास देशात एकही बहुराष्ट्रीय आस्थापन येणार नाही !

प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागीदारी करारावर (‘आर्सीईपी’वर) अन्य १५ देशांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत. आपणच बाहेर राहिलो, तर कोणत्याही बहुराष्ट्रीय आस्थापनाला भारतात यावेसे वाटणार नाही. ‘आर्सीईपी’ भारताच्या हिताचेच आहे.

राजकीय भाष्य करतांना काळजी घ्या ! – राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

लढाऊ विमान राफेलच्या खरेदी करारावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘चौकीदार चोर आहे’ असा उल्लेख केला होता.