
मुंबई – माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांना २ लाख रुपये पोटगी देण्याचा वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय ५ एप्रिल या दिवशी माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे.
धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद चालू आहे. करुणा मुंडे यांनी न्याय मागण्यासाठी वांद्रे कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. त्या वेळी कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांना प्रतिमास २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते; मात्र वांद्रे न्यायालयाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. या आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीत करुणा मुंडे यांच्याकडून मुलांचे पारपत्र (पासपोर्ट), जन्माचे प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज यांसारखी विविध कागदपत्रे सादर करत पत्नी असल्याचा दावा करणारी कागदपत्रे न्यायालयात सादर केली.