झारखंडमधील आघाडी सरकार पाडण्यासाठी मला १ कोटी रुपये आणि मंत्रीपद असे आमीष दाखवण्यात आले होते ! – काँग्रेसच्या आमदाराचा दावा

झारखंडमध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांचे आघाडी सरकार आहे. सरकार पाडण्यासाठी कुठल्या पक्षाने प्रयत्न केला, याविषयी मात्र त्यांनी भाष्य केलेले नाही.

(म्हणे) ‘समाज फादर स्टेन स्वामी यांचे ‘अमूल्य योगदान’ सदैव लक्षात ठेवील !’ – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मुक्ताफळे

शहरी नक्षलवादी असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटात सहभागी  असल्याचा आरोप असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे कुठले ‘योगदान’ झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ‘अमूल्य’ वाटते ?, हे जनतेला कळले पाहिजे !

रेल्वेतून प्रवास करतांना ‘कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र’ दाखवण्याचा नियम होण्याची शक्यता !

रेल्वेतून प्रवास करणार्‍या नागरिकांना आता ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीचा अहवाल दाखवण्याऐवजी ‘कोरोना प्रतिबंधात्मक लस’ घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा प्रकारचा नियम करण्याचा रेल्वेकडून विचार चालू आहे.

सिंहभूम (झारखंड) येथील ‘मदर तेरेसा वेलफेयर ट्रस्ट’च्या आश्रयगृहामध्ये गेल्या ४ वर्षांपासून अनेक मुलींचे लैंगिक शोषण

गेली ४ वर्षे पोलीस आणि प्रशासन झोपले होते का ? अशा प्रकारच्या आश्रयगृहातून अयोग्य कृती होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येऊनही त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात का येत नाही ?

३ वर्षांपूर्वी १३ कोटी रुपये व्यय करून झारखंडमधील कांची नदीवर बांधलेला पूल चक्रीवादळाच्या तडाख्याने पडला !

यातून इंग्रजांनी भारताला जितके लुटले नाही, तितके भारतीयच भारताला लुटत आहेत, असे म्हणता येईल !

भारतीय जन महासभेकडून केंद्रीय मंत्र्यांकडे कारवाईची मागणी

इन्स्टाग्रामवर हिंदूंच्या देवतांचा अवमान !

अध्यात्मच जीवनाला यशस्वी बनवण्याचा मार्ग दाखवू शकते ! – पू. नीलेश सिंगबाळ, पूर्वाेत्तर भारत मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या डॉ. श्रिया साह यांच्यासह काही युवकांनी साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट सांगितले. या कार्यक्रमाचा लाभ अनेक युवकांनी घेतला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ सोशल मीडिया कार्यशाळेचे आयोजन

या कार्यशाळेला पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील झारखंड, बंगाल, मेघालय अन् आसाम या राज्यांतील हिंदुत्वनिष्ठांची उपस्थिती होती. या कार्यशाळेला समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर राज्य संघटक श्री. शंभू गवारे यांनी संबोधित केले.

बलात्काराचा सूड घेण्यासाठी पीडित विवाहितेने पतीसमवेत मिळून केली बलात्कार्‍याची हत्या !

हबीबुल्लाह नावाच्या युवकाने एका विवाहितेवर बलात्कार केला. याचा सूड घेण्यासाठी या विवाहितेने तिच्या पतीच्या साहाय्याने हबीबुल्लाह याची हत्या केली. पोलिसांनी या दांपत्याला अटक केली आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले, तर प्रभु श्रीरामाची कृपा आपल्यावर होईल ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वोत्तर राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. गवारे यांनी रामनवमी साजरी करण्यामागील शास्त्र, पूजा विधी, प्रभु श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित घटनांशी असलेला साधनेचा संबंध आणि त्याचे महत्त्व, मनुष्य जीवनाचा उद्देश, श्री कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांचा नामजप करण्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन केले.