सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

साधक : संकटाच्या वेळी, पूजा करतांना किंवा इतरांशी बोलतांना नामाची आठवण होते; पण बसून नामजप करायला गेलो की, मन एकाग्र होत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘बसणे आणि चालणे यांत भेद काय आहे ? बोलतो, तेव्हा आपण तोंडावाटे क्रियाशील असतो. चालतांना पायांवाटे क्रियाशील असतो; म्हणून त्या वेळी नामजप होतो; पण ‘बसून (नामजप) करा’, असे म्हटले, तर ते कठीण जाते. शरीर बसलंय आणि केवळ तोंड अन् मन नामजप करत आहे, अशा वेळी अंतर्मनातील संवेदना बाह्यमनामध्ये येऊ लागतात. त्यांच्याकडे बाह्यमन खेचले जाते. त्यामुळे मनामध्ये पुष्कळ विचार येऊन मन नामावर एकाग्र होत नाही. नाम एक आहे आणि बाह्यमनात येणारे विचार अनेक आहेत. अनेकाकडे खेचले जाणे ही मनाची वृत्ती असल्याने ते नामावर एकाग्र होत नाही. त्यावर उपाय म्हणजे ‘मनात विचार येऊ लागताच मला त्याची जाणीव होईल आणि मी स्वतःला चिमटा काढीन’, अशी स्वयंसूचना द्यायची. शिक्षेच्या भीतीपोटी मन नामावर एकाग्र होऊ लागते.