सद्गुरु सत्यवान कदम यांची सर्वज्ञता !

श्रीमती वैशाली पारकर

‘कुडाळ येथील श्री. केदार तिवारी यांच्या घरात एकदा रात्री एक मोठा पक्षी आला. त्यांनी त्या पक्ष्याला बाहेर घालवण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण तो पक्षी गेला नाही. नंतर त्यांनी कुडाळ सेवाकेंद्रात येऊन सद्गुरु सत्यवान कदम यांना त्याविषयी सांगितले. सद्गुरु सत्यवानदादांनी त्यांना नामजप शोधून दिला. श्री. केदार यांनी सद्गुरु सत्यवानदादांनी सांगितलेला नामजप केला. नंतर काही वेळाने सद्गुरु दादांनी त्यांना सांगितले, ‘‘तो पक्षी आता घराच्या बाहेर गेला.’’ श्री. केदार यांनी घरी जाऊन पाहिल्यावर त्यांना घरात पक्षी दिसला नाही.’

– श्रीमती वैशाली पारकर (वय ७५ वर्षे), कुडाळ सेवाकेंद्र, सिंधुदुर्ग. (१५.३.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक