भारत पाकिस्तानकडून कोणत्या गोष्टींची खरेदी करतो ?

भारत पाकिस्तानकडून अनेक गोष्टींची खरेदी करतो, ज्यामध्ये खाद्यपदार्थांपासून कपड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. भारत पाकिस्तानकडून सर्वाधिक प्रमाणात काळ्या मिठाची खरेदी करतो. भारताचे अनेक देशांशी व्यापारी संबंध आहेत आणि तो अनेक देशांशी आयात-निर्यात व्यवहार करतो. यामध्ये पाकिस्तानचाही  समावेश आहे. भारत पाकिस्तानकडून अनेक गोष्टींची खरेदी करतो, दैनंदिन जीवनात लागणार्‍या अनेक गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे. आपला देश जशी पाकिस्तानकडून काही गोष्टींची आयात करतो, तशाच काही गोष्टी निर्यातही करतो. भारत पाकिस्तानकडून काळे मीठ, सुकामेवा, कातड्याचे सामान, सौंदर्य प्रसाधने, मुल्तानी माती, सल्फर, तांबा, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू इत्यादी खरेदी करतो. या वस्तूंसह भारत पाककडून विविध प्रकारची फळे, खनिज इंधन, प्लास्टिकचे सामान, लोकर आणि चुना यांचीही आयात करतो. यासमवेत कापूस, चष्म्यासाठी आवश्यक असणारे विविध घटक, वेगवेगळ्या प्रकारची रसायनेही पाकिस्तानकडून खरेदी केले जातात. स्टील आणि सिमेंटही आपण मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून आयात करतो. त्यातून पाकिस्तानला मोठा लाभ होतो.