नवी देहली – भारत आणि चीन यांच्यामधील संबंध सुधारण्यासाठी, ते अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही बाजूने योग्य पावले उचलली जात आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा चालू होणार आहे. दोन्ही देशांमध्ये थेट विमान सेवा पुन्हा प्रारंभ करण्यासाठी तत्त्वतः करार झाला आहे.
१. जून २०२० मध्ये लडाखच्या गलवानमध्ये दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. या संघर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आली होती. कैलास मानसरोवर यात्रा बंद झाल्यापासून भाविक उत्तराखंडाच्या व्यास खोर्यातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी येत होते.
२. परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये कझान (रशियातील शहर) येथे झालेल्या बैठकीत यात्रेला पुन्हा आरंभ करण्याविषयी सहमती झाली होती.