वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने दीर्घकाळ अंतराळात त्याचेे वर्चस्व राखले होते; मात्र आता ते धोक्यात आले आहे. चीनने ज्या वेगाने अंतराळात त्याची क्षमता वाढवली आहे आणि सामरिक डावपेचांवर भर दिला आहे, त्यामुळे लवकरच तो अंतराळात अमेरिकेशी युद्ध करण्याच्या सिद्धतेत आहे.
१. अमेरिकी संस्था ‘रँड’ने तिच्या नवीन अहवालात म्हटले की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने गेल्या २ दशकांत मिळवलेल्या अवकाश-आधारित क्षमतेचे विश्लेषण केले आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अमेरिकेकडे कमकुवत शक्ती म्हणून पहातात. यामुळे भविष्यात अंतराळातील स्पर्धेसाठी चीन आता आक्रमक सिद्धता करत आहे.
२. अहवालात म्हटले आहे की, चीन सैन्याच्या रणनीतीमध्ये प्रतिकारासह आक्रमकता समाविष्ट आहे, ज्याचा वापर विरोधकांना विनाशकारी अंतराळ युद्धाला सामोरे जाण्यास किंवा त्यास सामोरे जाण्यास भाग पाडण्यासाठी केला जातो.
३. या अहवालात सुचवण्यात आले आहे की, चीन अंतराळात त्याची सैनिकी सिद्धता प्रामुख्याने अमेरिकेला डोळ्यांसमोर ठेवून करत आहे. या प्रकरणी अमेरिकेने त्वरित निर्णय घेतला पाहिजे.
संपादकीय भूमिकाविस्तारवादी चीनची मानसिकता लक्षात घेऊन संपूर्ण जगाने त्यांच्या विरोधात आघाडी उघडणे आवश्यक झाले ! |