France Women Right To Abortion : फ्रान्समध्ये महिलांनी गर्भपात करण्याला राज्यघटनेची स्वीकृती !

स्वैराचाराला प्रोत्साहन देणार्‍या या घटनात्मक अधिकारामुळे उद्या फ्रान्सची अधोगती व्हायला लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !

चुकून वातानुकूलित डब्यात चढलेल्या महिलेला तिकीट तपासनीसाने गाडीबाहेर ढकलले !

अशा असंवेदनशील अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

६ लाख रुपयांचे पारितोषिक असलेल्या महिला माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने केले जेरबंद !

‘टीसीओसी’ (नक्षलवाद्यांची सशस्त्र आक्रमक मोहीम) कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांविरुद्धच्या अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रीय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्याला अटक केली आहे.

Pune Drug Adict Girls : पुणे येथील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणार्‍या तरुणींचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

आजची बहुसंख्य तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थाचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो !

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्‍या धर्मांध शिक्षिकेला शिवभक्तांनी क्षमा मागण्यास भाग पाडले !

या संदर्भात मुख्याध्यापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, झालेली घटना गंभीर असून यामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी शाळा व्यवस्थापनाने याची गंभीर नोंद घेऊन संबंधित शिक्षिकेवर योग्य ती कारवाई करावी. 

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कुवेतहून भारतात आलेल्या ३ आरोपींना जामीन !; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍यावर गुन्हा नोंद !…

कुवेतमधून बोटीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मुंबईतील न्यायालयाने जामीन संमत केला. आरोपीविरोधात संशयास्पद पुरावे किंवा आक्षेपार्ह आढळलेले नाही.

आई-वडील, सासू-सासरे समवेत असतील, तर महिलांना निराशा येण्याचे प्रमाण अल्प ! – हेलसिंकी विद्यापिठ, फिनलँड

आई-वडील, आजी-आजोबा किंवा सासू-सासरे समवेत असल्यास आई झालेल्या महिलांच्या मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो, असे फिनलंडमधील हेलसिंकी विद्यापिठाने केलेल्या एका नव्या अभ्यासातून उघड झाले आहे.

पुणे येथील मगरपट्टा पोलीस चौकीतील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांसह तिघे निलंबित !

‘मगरपट्टा सिटी पोलीस चौकीमध्ये एका महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद दोरकर, महिला पोलीस कर्मचारी उषा सोनकांबळे आणि वैशाली उदमले यांना निलंबित करण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलाशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणाचा हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचा निवाडा !

या तक्रारीनुसार पोलिसांनी अन्वेषण केले आणि प्रथमदर्शनी गुन्हा घडला असल्याचा अहवाल तालुका दंडाधिकार्‍यांकडे पाठवला.

घाटकोपर (मुंबई) मध्ये कुख्यात धर्मांध महिला गुन्हेगाराची पुन्हा दहशत !

समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने एवढ्या कुख्यात गुन्हेगाराला कारागृहाच्या बाहेर न सोडण्यासाठी जामीन मिळू नये असा उपाय पोलीस का काढत नाहीत ?