घाटकोपर (मुंबई) मध्ये कुख्यात धर्मांध महिला गुन्हेगाराची पुन्हा दहशत !

करिश्मा शेख ऊर्फ करिमा आपा

मुंबई – करिश्मा शेख ऊर्फ करिमा आपा ही घाटकोपरमधील कुख्यात ‘लेडी डॉन’ म्हणून ओळखली जाते. ती नुकतीच कारागृहातून जामिनावर बाहेर आली आहे आणि तिने उपनगरात परत दहशत माजवणे आरंभ केले आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ७५ लाख रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा असूनही तिला जामीन मिळाला आहे. बाहेर आल्यावर तिच्या गुन्ह्यातील साक्षीदाराच्या गळ्यावर सुरा ठेवून त्याला धमकी दिली.

एका गुन्ह्यात साक्षीदार असणारी आपा आणि तिचे २ गुंड यांनी वरील प्रकरणी जिवे मारण्याची धमकी दिल्यावरून त्यांच्यावर पुन्हा गुन्हा नोंद झाला आहे. खंडणी, शासकीय भूमी बळकावणे, वीजचोरी, पाणीचोरी, सोनसाखळी चोरी, भ्रमणभाष चोरी आदींमधील सहभागी गुन्हेगारांना ती आश्रय देते आणि त्यांचे ऐवज विकण्यात साहाय्य करते. त्यामुळे गुंड तिला ‘गॉडमदर’ म्हणतात. वरील संबंधी सर्व गंभीर गुन्ह्यांची नोंद तिच्यावर आहे.

संपादकीय भूमिका

  • एका कुख्यात धर्मांध महिला गुन्हेगाराची दहशत मोडून काढता न येणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पदच आहे !
  • समाज स्वास्थ्याच्या दृष्टीने एवढ्या कुख्यात गुन्हेगाराला कारागृहाच्या बाहेर न सोडण्यासाठी जामीन मिळू नये असा उपाय पोलीस का काढत नाहीत ?