समाजात वृद्धाश्रमांची आवश्यकता निर्माण झाली आहे ! – वीणा लेले
लहान मूल आजारी पडले, तर आई-वडील काळजी घेतात; परंतु वृद्धांची काळजी घेण्याची इच्छा असूनही वेळ देता येत नाही. त्यामुळे शिरगावात वृद्धाश्रम चालू केला.
लहान मूल आजारी पडले, तर आई-वडील काळजी घेतात; परंतु वृद्धांची काळजी घेण्याची इच्छा असूनही वेळ देता येत नाही. त्यामुळे शिरगावात वृद्धाश्रम चालू केला.
जागतिक महिला दिनानिमित्त ‘आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनी लि. रत्नागिरी’ने येथे ‘महिला सक्षमीकरण सन्मान सोहळ्या’त महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची साधिका कु. अपाला औंधकर हिचा सत्कार करण्यात आला.
५ दिवसांपूर्वी ‘जागतिक महिला दिन’ झाला. त्या निमित्ताने थोडा इतिहास येथे देत आहे. वर्ष १९१७ मध्ये रशियात महिलांनी ४ दिवसांचा एक संप केला होता. ‘ब्रेड अँड पीस’ (पाव आणि शांतता) ही त्यांची मागणी होती.
कारागृहात असणारा कुख्यात गुंड काला जठेडी राजस्थानमधील महिला गुंडअनुराधाशी लग्न करणार आहे. देहलीतील द्वारका न्यायालयाने काला जठेडीला ‘पॅरोल’ संमत केला आहे.
अर्वाचीन कालखंडापर्यंत पोचण्यापूर्वी प्राचीन भारतातील वैदिक काळातील स्त्रियांचे ज्ञानक्षेत्रातील योगदान आपल्याला लक्षात घ्यावे लागते. आपली प्रज्ञा, अंतर्दृष्टी आणि आचरण यांच्या उत्कर्षाने महिलांनी वैदिक संस्कृतीला प्रदात्त रूप देण्यात सहकार्य केले.
महिलादिनानिमित्त दैवज्ञ भवन येथे रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींच्या वस्तू प्रदर्शन १० मार्चपर्यंत सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३० या वेळेत सर्वांसाठी खुले रहाणार आहे.
‘‘अनेक राजकीय पक्ष समान नागरी कायद्यावर राजकारण करत आहेत. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे गोवा हे पहिले राज्य आहे आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो.’’ – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
महिलांचे महिलापण शालीनतेमध्ये आहे. ते जपण्यासाठी घराघरातूनच संस्कृतीचा जागर व्हायला हवा. मुलींना वळण लावण्याचे दायित्व पालकांचेच आहे.’
अजूनही अधिकांश स्त्रिया भारतीय संस्कृती सांभाळून रहाणार्या आहेत. ‘स्त्री आहे म्हणून जग आहे ! स्त्री आहे म्हणून पुरुष आहे; पण पुरुष आहे म्हणून स्त्री आहे, असे नाही’
राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने नवी देहलीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या वेळी पथकाने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या प्रसंगी पथकाने संदेशखाली येथील पीडित महिलांच्या जबानीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला.