समष्टी श्रीकृष्णभक्ती हवी !
देश स्वतंत्र झाला आहे; मात्र व्यवस्था पारतंत्र्याप्रमाणे ! हे पालटण्यासाठी मोठ्या पदावरील व्यक्तींनी आता त्यांची व्यक्तीगत उपासना करत कंबर कसणे आवश्यक आहे. ते सुधारले, तर व्यवस्था सुधारील, त्यामुळे जनता जनार्दन प्रसन्न झाला की, समष्टीतील श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळून त्यांची भक्ती लवकर फलद्रूप होईल, हेच खरे !
ग्रामीण भागातही मुलींना ‘व्यावसायिक शिक्षण’ देण्याची व्यवस्था व्हायला हवी ! – विलास माने
‘खेडेगावांत ४-५ सहस्र वस्ती आहे. तेथे केवळ ४ थी ते ७ वी पर्यंतच शाळा आहेत. त्यामुळे मुलांना १० वीपर्यंत शिक्षणासाठीसुद्धा तालुक्याच्या ठिकाणी अथवा मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे मुलींची ३० ते ४० टक्के लोकसंख्या पुढे शाळा शिकू शकत नाही.
पनवेल येथे महिला प्रवाशांनाही मिळणार एनएमएमटी बस पास !
नुकत्याच झालेल्य महापालिकेच्या ४१ व्या सर्वसाधारण सभेत याविषयी निर्णय घेण्यात आला.
स्त्रियांनो, स्वतःतील स्त्रीशक्तीचा जागर करून दुर्गामातेकडे बळ मागूया ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती
धर्माचरण आणि स्त्री शक्तीचा जागर करून आदिशक्तीची कृपा संपादन करूया अन् दुर्गामातेकडे बळ मागूया, असे आवाहन समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी केले. त्या ऑनलाईन ‘जागर देवीतत्त्वाचा’ या शौर्य जागृती’ व्याख्यानात बोलत होत्या.
‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत जांभिवली (खालापूर) येथे महिलांसाठी ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान !
जांभिवली, खालापूर येथे महिलांसाठी ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. परिसरातील महिलांनी व्याख्यानाचा लाभ घेतला.
दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या नावे सक्षम महिला सरपंचांना पुरस्कार देणार ! – ग्रामविकास राज्यमंत्री सत्तार
राज्यमंत्री सत्तार पुढे म्हणाले की, आपल्याकडे ५० टक्के महिला सरपंच आहेत. विकासाचे ‘व्हिजन’ (दृष्टी) महिलांकडे आहे. त्यांना संधी मिळायला हवी.
याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी !
देशात ३३ लाखांहून अधिक बालके कुपोषित आहेत. त्यांपैकी निम्म्याहून अधिक बालके तीव्र कुपोषित श्रेणीत येतात, अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाने माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.
महाराष्ट्रात पुरुषांपेक्षा महिलांना कोरोनाची बाधा अधिक !
महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरपर्यंत एकूण ६६ लाख १७ सहस्र ६५४ जणांना कोरोनाची लागण झाली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत मुलींच्या प्रवेशाचे निःपक्षपणे स्वागत करा ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे
‘पुरुष छात्रांप्रमाणे महिलाही चांगली कामगिरी करतील’, असा विश्वास सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी व्यक्त केला. ‘महिलांच्या प्रवेशामुळे स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने प्रबोधिनीने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे’, असेही ते म्हणाले.