संभाजीनगर येथे भांडण सोडवण्यास गेलेल्या ‘दामिनी’ पथकावरच २ तरुणींचे आक्रमण !

शहरात कुठेही महिलांच्या साहाय्यासाठी धावून जाणार्‍या ‘दामिनी’ पथकाला भांडणार्‍या महिलांनी आक्रमण करून मारहाण केली ! स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

समाजाने धर्माचरण केल्यास आजही महिलांना रामराज्याप्रमाणे निर्भयता अनुभवता येईल ! – नरेंद्र सुर्वे

आपल्यालाही श्रीरामासारखा आदर्श राजा हवा असेल, तर आपल्यालाही धर्माचरण आणि साधना करायला हवी. तसे झाले तर केवळ श्रीराम मंदिराच्या उभारणीचे नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर ‘रामराज्य’ आणि रामराज्याप्रमाणे निर्भयता अनुभवता येईल.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. रूपाली चाकणकर यांची निवड !

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राज्यशासनाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आहे. मागील दीड वर्षापासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते.

चंद्रपूर येथे शिक्षिकेच्या विनयभंगाप्रकरणी बीआयटी अभियांत्रिकीच्या २ प्राचार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

प्राचार्यांनी शिक्षिकेचा विनयभंग करणे म्हणजे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्यासारखेच होय ! अशा वासनांधांना बडतर्फच करायला हवे !

२ महिलांची आधुनिक वैद्य आणि कर्मचारी यांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णालयांबाहेर प्रसुती ! 

लढाणा जिल्ह्यातील २ रुग्णालयांतील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार !

नागपूर येथे कोरोना संसर्गाच्या काळात महिलांच्या संदर्भात गुन्हे वाढले !

या गुन्ह्यांविषयी कठोर शिक्षा हवी ! समाजातील गुन्हेगारी नष्ट करायची असेल, तर समाजातील लोकांना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरणी करणे आवश्यक आहे, तसेच मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी शाळा आणि महाविद्यालये येथे संस्कारवर्ग आणि सत्संग घेणे आवश्यक आहे !

महिला कृषी साहाय्यकांशी गैरवर्तन करणार्‍या कृषी पर्यवेक्षकावर कारवाई करा ! – मनसेची कृषी अधिकार्‍यांकडे मागणी

अशी मागणी का करावी लागते ? कृषी अधिकारी त्या पर्यवेक्षकाला पाठीशी घालत आहेत का ?

‘स्त्री’ सन्मान !

हिंदु धर्मात ‘स्त्री’ ला अत्यंत सन्मानाचे स्थान आहे. परस्त्री मातेसमान आणि भगिनीसमान मानली गेली आहे. असे विचार समाजामध्ये रुजण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, नैतिकतेचे धडे देणे, तसेच दुष्कृत्य करणार्‍यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक आहे.

फेसबूकवर ओळख झालेल्या २ अल्पवयीन मुलींचे मित्रांसमवेत पलायन !

२ अल्यवयीन मुली मैत्रिणीच्या वाढदिवसाला जात असल्याचे कारण सांगून घरातून बाहेर पडल्या आणि फेसबूकच्या माध्यमातून ओळख झालेल्या मित्रांकडे वर्धा रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी जाऊन तेथून पसार झाल्या.