‘खेडेगावांत ४-५ सहस्र वस्ती आहे. तेथे केवळ ४ थी ते ७ वी पर्यंतच शाळा आहेत. त्यामुळे मुलांना १० वीपर्यंत शिक्षणासाठीसुद्धा तालुक्याच्या ठिकाणी अथवा मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे मुलींची ३० ते ४० टक्के लोकसंख्या पुढे शाळा शिकू शकत नाही. ग्रामीण भागात मुलींना अनुकूल असे व्यावसायिक शिक्षण असायला पाहिजे. यामध्ये प्रामुख्याने शेती उद्योगामध्ये लहान-मोठी कामे त्या शिकू शकतात. नर्सिंग, बचत गट, दूध व्यवसाय, शिक्षण क्षेत्र हेही महिलांसाठी चांगलेच आहे.’
(संदर्भ : ‘लोकजागर’, ८.३.२०१५)