पुणे जिल्ह्यात १ सहस्र २८९ बालके मध्यम कुपोषित आणि ३७१ बालके अतीतीव्र कुपोषित !

एका पुणे जिल्ह्यात सहस्रो बालके कुपोषित असणे चिंताजनक आहे. ही महाराष्ट्राची प्रगती म्हणायची का ? बालक म्हणजे देशाची भावी पिढी, हे लक्षात घेऊन कुपोषित बालकांचे प्रमाण अल्प करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

‘के.एम्.टी.’ची महिलांसाठी विशेष बस सेवा लवकरच चालू होणार !

महिलांसाठी विशेष बससेवा नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. उभे राहून प्रवास करावा लागतो. महिलांसाठी विशेष सेवा चालू झाल्यास ‘के.एम्.टी.’च्या दृष्टीने, तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

खंडणीची मागणी करणार्‍या बनावट एन्.सी.बी.च्या अधिकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्रीची आत्महत्या !

आरोपींनी अमली पदार्थ घेतल्याच्या प्रकरणी अटक करण्याची धमकी देऊन तिच्याकडे खंडणी मागितली होती. ही रक्कम जमा न झाल्याने आणि वारंवार खंडणीची मागणी करून मानसिक त्रास दिल्याने अभिनेत्रीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य वितरणाचे काम महिला बचत गटांना देणार !

कोरोनाच्या संसर्गामुळे तांदूळ आणि डाळी शासनाकडून शाळांना देण्यात येत होत्या. ते वाटण्याचे काम शाळेतील कर्मचारी करायचे…

महिलांचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही ! – विधानसभेत सर्वपक्षीय आमदारांची भावना

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर अवमान प्रकरणाची चौकशी चालू असून कारवाई होणार ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

नगर येथील लाचप्रकरणी भूमीअभिलेख अधिकारी महिलेस ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा !

नगर येथील एका शेतकर्‍याने भूमीअभिलेख कार्यालयात भूमीची ५ तुकड्यांत मोजणी करण्यासाठी अर्ज करून सरकारी मोजणीचे शुल्क भरले होते….

संयुक्त चिकित्सा समितीच्या शिफारशीसह ‘शक्ती’ फौजदारी कायद्याचा अहवाल विधानसभेत सादर !

विधानसभेत २२ डिसेंबर या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीने चर्चा करून शिफारस केलेल्या महिला सुरक्षेच्या ‘शक्ती’ फौजदारी कायद्याचा अहवाल सादर केला.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना वारसप्रमाणपत्र देण्याविषयी तातडीने कार्यवाही करा ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गात कोरोनामुळे पालक गमावलेली २६६ बालके, तर ५६८ विधवा

बडवानी (मध्यप्रदेश) येथे आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती दांपत्याला अटक

जगभरात कुठे हिंदूंकडून कधी कुणाचे धर्मांतर केल्याचे आणि त्यामुळे त्यांना अटक झाल्याचे ऐकले आहे का ? मग ख्रिस्ती आणि मुसलमानांकडून हिंदूंच्या संदर्भात असे का होते ? हे निधर्मीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी देतील का ?

सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग आवश्यक ! – डॉ. नीलम गोर्‍हे, विधान परिषद उपसभापती

महिलांच्या सुरक्षिततेसमवेत महिला सक्षमीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग असणे आवश्यक आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले.