शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य वितरणाचे काम महिला बचत गटांना देणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना धान्य वितरण करण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे तांदूळ आणि डाळी शासनाकडून शाळांना देण्यात येत होत्या. ते वाटण्याचे काम शाळेतील कर्मचारी करायचे. हे सुरळीत चालू असतांना मध्येच शासनाने ‘या आहाराचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या अधिकोषाच्या खात्यात देण्यात येणार’, असे घोषित केले आणि सुका शिधाही (तांदूळ, डाळी) देणे बंद केले. आता पुन्हा २५० कोटी रुपये रकमेचे धान्य वाटप करण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.