गोवा : बसमध्ये सोनसाखळी चोरणार्‍या ३ बांगलादेशी महिला कह्यात !

बांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत ! सरकारने अशा लोकांना न पोसता नागरिकत्व नोंदणी कायदा लवकरात लवकर कार्यवाहीत आणून अशांना देशातून हाकलून लावावे !

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जाणार्‍या महिला हवालदाराची धर्मांधाकडून छेडछाड आणि अरेरावी !

पोलिसांकडून महिला हवालदाराचीच तक्रार घेण्यास टाळाटाळ ! महिला पोलिसांचीही तक्रार न घेणारे पोलीस सर्वसामान्य हिंदु महिलांची तक्रार कधी घेतील का ? अशांना तात्काळ बडतर्फ करा !

राज्‍यातील ५५ सहस्र ७९७ कर्तबगार महिलांचा सन्‍मान करणार ! – मंगलप्रभात लोढा, मंत्री, महिला आणि बाल विकासमंत्री

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमित्त राज्‍यशासन राज्‍यातील २७ सहस्र ८९७ ग्रामपंचायतींमधील ५५ सहस्र ७९७ कर्तबगार महिलांचा सन्‍मान करणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

सिंधुदुर्ग : रेडी येथे फलकावरील महिलांच्या छायाचित्रावर अश्‍लील लिखाण करून विटंबना करणार्‍या ५ जणांना अटक !

धर्मशिक्षणाअभावी समाजाचे होत असलेले नैतिक अधःपतन ! महिलांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील गायब झालेल्या ५३५ मुलींच्या तस्करीची शक्यता ! – सौ. रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली गायब होत असतांना त्यांना शोधण्यासाठी सुरक्षायंत्रणांनी काय प्रयत्न केले, तेही जनतेसमोर यायला हवे !

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्र आणि धर्म यांचे विचार आपण पुढील पिढीला दिले पाहिजेत ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी, कणेरी मठ, कोल्हापूर

सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर या तिघींनी काय हालअपेष्टा सोसल्या ? ते पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

 ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने …

खूप हालअपेष्टा सहन करून राष्ट्राचा संसार पुढे नेण्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचणार्‍या त्या तिघी. म्हणजे सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर.

महिलांचे अधिकार आणि सन्मान यांच्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणार ! – डॉ. भारती चव्हाण, अध्यक्षा, मानिनी फाऊंडेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी महिला बालकल्याण विभागासाठी २५ सहस्र ४४९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. केंद्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराविषयी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. 

मेरठ (उत्तरप्रदेश) येथील उपाहारगृहात मुसलमान तरुणांकडून हिंदु तरुणींचा बुद्धीभेद !

मेरठ, उत्तरप्रदेश येथील शास्‍त्रीनगरमध्‍ये असणार्‍या एका उपाहारगृहामध्‍ये हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांकडून बुद्धीभेद केला जात असून येथे ‘लव्‍ह जिहाद’साठी एक केंद्र चालवले जात असल्‍याचा आरोप करत बजरंग दलाच्‍या कार्यकर्त्‍यांनी येथे धाड घातली.

पुणे येथून गेल्‍या ३ मासांत ४४७ मुली आणि महिला बेपत्ता !

राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा रूपाली चाकणकर यांची पत्रकार परिषदेत माहिती