आसामला पहिल्या सुवर्णपदकाचा मान

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 

पणजी, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात चालू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आसामच्या महिला बॅडमिंटन संघाने पहिले सुवर्णपदक जिंकण्याचा मान मिळवला आहे. सांघिक गटातील अंतिम लढतीत त्यांनी महाराष्ट्राला ३ विरुद्ध ० फरकाने हरवून विजेतेपद प्राप्त केले. महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बॅडमिंटन स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर मैदानात चालू आहे.

कर्नाटकला पुरुष सांघिक बॅडमिंटनमध्ये सुवर्ण

कर्नाटकने ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमधील पुरुष सांघिक सुवर्णपदक जिंकतांना महाराष्ट्राचा अंतिम लढतीत ३ विरुद्ध १ फरकाने पराजय केला. हा सामना २० ऑक्टोबर या दिवशी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानात झाला. महिलांच्या पाठोपाठ महाराष्ट्राच्या पुरुष संघालाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.