अशी मागणी का करावी लागते ?
ठाणे – येथील दिवा शहरात नवरात्रोत्सव काळात महिला पोलिसांची संख्या वाढवून निर्भया पथकाच्या माध्यमातून गस्त चालू ठेवावी, अशी मागणी भाजपच्या दिवा महिला मंडळाच्या अध्यक्षा ज्योती पाटील यांनी केली आहे. ‘महिलांची सुरक्षितता आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या दृष्टीने पोलिसांचे मनुष्यबळ वाढवण्यात यावे’, असे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे.