गेल्या ३ मासांत २ सहस्र २०० हिंदु मुलींचे धर्मांतर झाले आहे ! – ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर), प्रसिद्ध कीर्तनकार

ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर)

अहिल्यानगर – गावातील पुढार्‍यांनी शाळेतील भ्रमणभाषचा वापर बंद करून प्रत्येक गावामध्ये एक समिती स्थापन करावी. गावाकडे लक्ष द्यावे. गेल्या ३ मासांत २ सहस्र २०० हिंदु मुलींचे धर्मांतर झाले आहे. आजच्या काळात मुलींना ‘ब्लॅकमेल’ करून धर्मांतर करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. आपल्या मुला-मुलींवर चांगले संस्कार करा. मुलीही वडिलांच्या विरोधात उठतात आणि वडिलांना संपवतात. हा सगळा तमाशा सामाजिक माध्यमे आणि भ्रमणभाष यांच्या अतीवापरामुळेच होत आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांनी केले. भोकर येथे रेणुकामाता नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने १६ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या दुसर्‍या माळेच्या कीर्तनात ते बोलत होते. या प्रसंगी पंचक्रोशीतील सहस्रो नागरिक उपस्थित होते.

(सौजन्य : Grand Marathi)

या वेळी ते म्हणाले की, या युगात देवाचे अनंत अवतार असून देवीच्या शक्तीची ताकद महान आहे. म्हणून धर्म आणि संस्कृती टिकवा. विश्‍वातील सर्वात पवित्र ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्‍वरी आहे. सद्गुरु नारायणगिरी महाराज आणि महंत भास्करगिरी महाराज हे देवाने पाठवलेले भगवंताचे खरे दास आहेत.