वक्फ बोर्ड रहित करण्यासह काशी आणि मथुरा यांच्याविषयी दिशा ठरणार !

महाकुंभातील विश्‍व हिंदु परिषदेच्या शिबिरात संत संमेलनाचे आयोजन

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – गेल्या अनेक कुंभांमध्ये विश्‍व हिंदु परिषदेच्या शिबिरात संतांचे संमेलन होत आले आहे. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. या संत संमेलनामध्ये वक्फ बोर्ड रहित करण्याचे सूत्र संत चर्चा करतील, असे म्हटले जात आहे. या संमेलनापूर्वी विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शक समितीच्या बैठकीत वक्फ बोर्डाच्या सूत्रावरही चर्चा केली जाईल.

या संत संमेलनात धर्मांतर, मंदिरांवरील सरकारी नियंत्रण आणि ज्ञानवापी अन् मथुरा ही सूत्रेही चर्चेत येणार आहेत. संत परिषदेची कार्यसूची केंद्रीय मार्गदर्शन मंडळाच्या बैठकीत ठरवली जाणार आहे, अशी माहिती विहिंपचे अखिल भारतीय संत संपर्क प्रमुख अशोक तिवारी यांनी दिली.

महाकुंभनगरीतील विहिंपच्या शिबिरात होणारे कार्यक्रम

२४ जानेवारी : केंद्रीय मार्गदर्शन मंडळाची बैठक
२५ जानेवारी : साध्वी परिषद
२५-२६ जानेवारी : संत परिषद
२७ जानेवारी : युवा संत परिषद