Pune Illegal Mosque And Madrasa Destroyed : पुणे येथील चिंभळी गावातील अवैध मशीद आणि मदरसा उद्ध्वस्त !

‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीने विषय समोर आणल्यानंतर राज्य सरकार सक्रीय !

छायाचित्र सौजन्य : Sudarshan News

पुणे, २३ जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील राजगुरुनगर तहसीलच्या चिंभळी गावात अवैध मशीद आणि मदरसा यांवर बुलडोझर चालवून तो उद्ध्वस्त करण्यात आला. ही कारवाई पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (‘पी.एम्.आर्.डी.ए.’) यांनी केली आहे. चिंभळी ग्रामपंचायत क्षेत्रातील गट क्रमांक २०० आणि २०५ येथे शाकीर इस्माईल याने इस्लामी धार्मिक स्थळ आणि रुग्णालय यांच्या नावाखाली अवैधरित्या मशीद, मदरसा, कब्रस्तान आणि नमाजस्थळ यांचे मोठ्या प्रमाणावर बांधकाम चालू केले होते. प्रत्येक शुक्रवारी शेकडो लोकांना नमाजासाठी बोलावले जात होते. या अवैध बांधकामाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ, विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी तीव्र निषेध नोंदवला. ‘सुदर्शन न्यूज’ वाहिनीने हा विषय ठळकपणे समोर आणला होता. त्यानंतर कारवाई करण्यात आली. (प्रकरण उघड केल्यावर कारवाई करण्यापेक्षा प्रशासनाने ती आधीच करायला हवी होती ! – संपादक)  

१. शासनाने चिंबळी गावात अशा बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत अनुमती देऊ नये आणि अशी बांधकामे तात्काळ थांबवण्यात यावीत, अन्यथा ग्रामस्थ हे अवैध बांधकाम उद्ध्वस्त करतील, असा ठराव चिंबळी गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आला होता.

२. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि ‘पी.एम्.आर्.डीए.’ आयुक्त यांना याबाबत वारंवार तक्रारी देण्यात आल्या होत्या. सुदर्शन न्यूजच्या बातमीमुळे सरकारने तात्काळ चौकशीचे आणि कठोर कारवाईचे आदेश दिले. ‘पी.एम्.आर्.डी.ए.’चे वरिष्ठ अधिकारी आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यांनी मिळून अवैध बांधकामावर बुलडोझर चालवून ते पूर्णतः नष्ट केले.

३. बजरंग दल जिल्हा संयोजक नाना सावंत यांनी सांगितले की, त्या गावामध्ये एकाही मुसलमानाचे घर नाही, तरीही एवढ्या मोठ्या मशिदीचे काम चालू करण्यात आले होते.

४. वर्ष २०१८ मध्ये बांधकामाचे काम चालू झाले होते, तेव्हा सगळ्या ग्रामस्थांनी मिळून हे अवैध बांधकाम थांबवण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले होते; मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हे काम चालू राहिले. त्याच्या शेजारीही जागा घेऊन त्यांनी ते काम चालू केले.

५. पोलिसांना निवेदन दिल्यानंतर पोलिसांनी हे अवैध बांधकाम थांबवले.

संपादकीय भूमिका

एवढ्या मोठा प्रमाणावर अवैध बांधकाम चालू असतांना प्रशासनाने स्वतःहून कृती करणे अपेक्षित होते. त्यासाठी ग्रामस्थ किंवा अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना आवाज उठवावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद !