पुणे – सिंहगडाच्या ‘कल्याण दरवाजा’ आणि ‘परिसर संवर्धन’ यांकरता प्रादेशिक पर्यटन योजनेतून ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी संमत झाला आहे. पुरातत्व विभागाच्या वतीने एप्रिलअखेर या कामांना प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून सिंहगडाचा विकास आराखडा प्रलंबित होता. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार गडाच्या विकासाकरता निधी संमत झाला आहे.
हिंदवी स्वराज्यरक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांचे ‘बलीदान स्थळ’ तुळापूर आणि समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) येथील २६९ कोटी २४ लाख रुपयांच्या विकास आराखड्यातील कामांची निविदा प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र जेजुरी विकास आराखड्यांतर्गत १०९ कोटी ५७ लाख रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.