वक्फ बोर्डाचा तब्बल ५० वर्षे लढा !
भाग्यनगर (तेलंगाणा) – गेल्या तब्बल ५० वर्षांपासून वक्फ बोर्डाने प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल ‘मॅरियट’ त्याच्या भूमीवर बांधण्यात आल्याचा दावा तेलंगाणा उच्च न्यायालयात केला होता. चे म्हणत न्यायालयाने मात्र हॉटेलला मोठा दिलासा देत वक्फ बोर्डाच्या या दाव्याला ‘गैरवर्तन’ असल्याचे म्हटले आहे. तेलंगाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती अनिल कुमार जुकांती यांच्या खंडपिठासमोर ही सुनावणी झाली.
वर्ष १९६४ मध्ये अब्दुल गफूर नावाच्या व्यक्तीने या हॉटेलवर वक्फ बोर्डाचा अधिकार असल्याचे सांगून त्या काळी ‘व्हाईसरॉय’ म्हणून ओळखल्या जाणार्या या हॉटेलच्या विरोधात ‘वक्फ कायदा १९५४’अन्वये खटला प्रविष्ट (दाखल) केला होता. वक्फ बोर्डाने जवळपास ५० वर्षे हे प्रकरण कायदेशीर गुंतागुंतीत अडकवून ठेवले. वर्ष २०१४ मध्ये बोर्डाने हॉटेल मॅरियटला वृत्तपत्रात नोटीस देऊन कायदेशीर कारवाईची धमकी दिली. वक्फ बोर्डाच्या कायदेशीर कारवाईच्या धमकीवर हॉटेल मॅरियटच्या संचालकांनीही न्यायालयात जबाब नोंदवला. या उत्तरात वक्फवर न्यायालयाच्या जुन्या आदेशांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. शेवटी हे प्रकरण उच्च न्यायालयात पोचले. न्यायालयाने वक्फ बोर्डाची याचिका आरंभीपासूनच बेकायदेशीर मानत शेवटी त्याचा दावा फेटाळला.
संपादकीय भूमिकाआसुरी ‘वक्फ कायदा १९९५’च्या आडून भारताचे इस्लामिस्तान करण्याचा घाट कशा प्रकारे घातला जात आहे, याचे हे एक उदाहरण ! त्यामुळे आता वक्फ कायदाच रहित होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत ! |