ब्राह्मण महासंघाचा तृप्ती देसाई यांना विरोध

तृप्ती देसाई यांना विरोध करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी सहकार्‍यांसह शिर्डी येथे लावलेल्या फलकाचे पूजन केले आणि संस्थानच्या भूमिकेला पाठिंबा दिला. १० डिसेंबरला तृप्ती देसाई  आल्यास त्याला विरोध करू, अशी चेतावणी महासंघाने दिली आहे.

ठाणे येथील मंदिराची दानपेटी फोडणार्‍या दोघांना अटक

येथील मानपाडा भागात असलेल्या सिद्धीविनायक मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम चोरणार्‍या अजय जयस्वार (वय २२ वर्षे) आणि सलमान खान (वय २० वर्षे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली.

देवस्थान सहलीचे ठिकाण नसल्याने तिथे साधन-शुचिता पाळायलाच हवी ! – ब्राह्मण महासंघ महिला आघाडी, पुणे

मंदिरात दर्शनास येणार्‍या भाविकांनी वस्त्रसंहिता पाळावी, असे आवाहन शिर्डी देवस्थानद्वारे करण्यात आले आहे. हे अतिशय योग्य असून ब्राह्मण महासंघ महिला आघाडीचा या निर्णयास पूर्ण पाठिंबा आहे. देवस्थान सहलीचे ठिकाण नसल्याने तिथे साधन-शुचिता पाळायलाच हवी, असे स्पष्ट मत ब्राह्मण महासंघाच्या महिला आघाडीने व्यक्त केले आहे.

(म्हणे) ‘पुजारी अर्धनग्न, मग भाविकांच्या कपड्यांवर निर्बंध का ?’

व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यांचा तिच्या मनावर परिणाम होत असतो. तोकडे कपडे परिधान केल्यामुळे मन चंचल होते. त्यामुळे मंदिर, तसेच धार्मिक कार्यक्रम यांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. अध्यात्माचा गंध नसल्यामुळे धार्मिक विषयावर बोलू नये, याचे सामान्य ज्ञान नसलेल्या तृप्ती देसाई !

निपाणी येथील श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटीची चोरी

येथील बडमंजी ‘प्लॉट’मध्ये असणार्‍या श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटी फोडून १० सहस्रांहून अधिक रुपयांची चोरी केल्याची घटना २९ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली. याशिवाय बसस्थानक परिसरातील मद्यालयातही चोरीची घटना घडली आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठलाचा प्रसाद आता घरपोच !

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री विठ्ठलाचा प्रसाद आणि अन्य वस्तू आता भाविकांना घरपोच मिळणार आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी सेवा समितीने तयार केलेल्या एका संकेतस्थळाच्या माध्यमातून ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

भाविकांनी साईबाबांचे दर्शन भारतीय वेशभूषेतच घ्यावे ! – साई संस्थान, शिर्डी

साई संस्थानचा स्तुत्य निर्णय ! अन्य मंदिरांनीही या निर्णयाचे अनुकरण करावे, ही अपेक्षा !

पुदुचेरी येथे धर्मांधाने मंदिरात घुसून शिवीगाळ करत केले ‘फेसबूक’वरून थेट प्रक्षेपण

हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करणे किती महत्त्वाचे झाले आहे, हे लक्षात येते ! आतापर्यंत रात्री गुपचूप मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची तोडफोड होत होती, आता थेट मंदिरात घुसून शिवीगाळ केली जात आहे, उद्या तोडफोड करण्याचे धाडस झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावरील त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवावर कोरोनाचे सावट, मंदिर प्रदक्षीणेवर निर्बंध घातल्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर

शासनाने मंदिरे चालू केली असली, तरी तेथे मोकळेपणाने फिरता येत नसल्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाविषयी भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्साहात

८ मासांनंतर नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात उत्साहाने कार्तिक पौर्णिमा साजरी झाली. अनेक दत्त भक्तांनी मंदिर परिसरात दीप लावल्यामुळे तो उजळून गेला होता. दुपारी ३ वाजता पवमान सुकृत पठण केले. रात्री उशिरा धुपारती पालखी सोहळा पार पडला.