नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्साहात

नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – ८ मासांनंतर नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात उत्साहाने कार्तिक पौर्णिमा साजरी झाली. अनेक दत्त भक्तांनी मंदिर परिसरात दीप लावल्यामुळे तो उजळून गेला होता. पहाटे ५ वाजता काकड आरती झाली. यानंतर दुपारी साडेबारा वाजता श्री चरणावर षोडशोपचार महापूजा करण्यात आली. दुपारी ३ वाजता पवमान सुकृत पठण केले. रात्री उशिरा धुपारती पालखी सोहळा पार पडला.

सायंकाळी ६ नंतर दत्त मंदिर घाट परिसर शेकडो पणत्यांनी उजळून गेला.  महिलांनी नदीपात्रात दीप सोडल्याने नदीपात्रही दिव्यांनी उजळून गेले. दत्त देवस्थानच्या वतीने भाविकांची ‘थर्मल टेस्ट’, तसेच ‘सॅनिटायझेशन’ केले. मुख्य रांगेसमवेत मुखदर्शनाची सोय केली होती. भाविकांनी सामाजिक अंतर पाळत आणि ‘मास्क’ लावून रांगेने दर्शन घेतले.