निपाणी येथील श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटीची चोरी

  • असुरक्षित मंदिरे !
  • देवाची भक्ती केली, तर देव भक्ताला कधीच काही अल्प पडू देत नाही. मंदिरात चोरीसाठी नव्हे, तर देवाचे दर्शन घेण्यासाठी यायचे असते, हे कळण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे !

निपाणी (जिल्हा बेळगाव) – येथील बडमंजी ‘प्लॉट’मध्ये असणार्‍या श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटी फोडून १० सहस्रांहून अधिक रुपयांची चोरी केल्याची घटना २९ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली. याशिवाय बसस्थानक परिसरातील मद्यालयातही चोरीची घटना घडली आहे. चोर मंदिरात असणार्‍या ‘सीसीटीव्ही’मध्ये दिसत आहे. त्याआधारे चोराचा शोध घेण्यात येत आहे. दळणवळण बंदीनंतर निपाणी शहरासह परिसरात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या ३ मासांपासून शहर परिसरातील बंद घरे, मंदिर यांना त्यांनी लक्ष्य केले आहे. शहरात चोर सक्रीय, तर पोलीस निष्क्रीय अशी चर्चा आहे.