साई संस्थानला कामकाजास मुभा; मात्र धोरणात्मक आणि आर्थिक निर्णयावर निर्बंध ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

साई संस्थानचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे आणि त्यांच्या समवेत निवडण्यात आलेल्या एकूण १२ विश्वस्तांना कामकाज पहाण्यास यापूर्वी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिलेली स्थगिती ३० नोव्हेंबर या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने उठवली.

उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

उपचाराच्या वेळी रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यासाठी डॉक्टरांना दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. ‘रुग्णांवर उपचार करतांना त्यांच्या आयुष्याची निश्‍चिती कुठलाच डॉक्टर देऊ शकत नाही.

न्यायालयांनी सरकारवर अंकुश ठेवायचा असेल, तर सरकार हवेच कशाला ?

‘खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची यंत्रे झाली आहेत. रुग्णालये ही ‘रिअल इस्टेट’ (भूमी खरेदी-विक्री व्यवसाय) उद्योग बनत आहेत. रुग्णांना संकटकाळात साहाय्य करण्याऐवजी पैसे कमावणे, हे रुग्णालयांचे ध्येय झाले आहे.

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशातून जातीवाद संपलेला नाही ! – सर्वोच्च न्यायालय

जे देशात दिसून येते, तेच न्यायालयाने सांगितले आहे. या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

न्यायालयाने फरार घोषित केलेले परमबीर सिंह मुंबईत उपस्थित !

परमबीर सिंह यांनी सर्वाेच्च न्यायालयात मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगत त्यांच्यावरील गुन्ह्याची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

प्रदूषणाविषयी देशाच्या राजधानीचे हाल पहाता आपण जगाला काय संदेश देत आहोत ? – सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले

प्रत्येक सूत्रांसाठी न्यायालयात धाव घेऊन सरकारला आदेश द्यावा लागत असेल, तर सरकारी यंत्रणा नावाचा डोलारा हवाच कशाला ?

गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या आमदार आणि खासदार यांच्यावर आजीवन बंदीविषयी केंद्राची नेमकी भूमिका काय ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

सरकारच्या भूमिकेखेरीज अशा लोकप्रतिनिधींवर निवडणूक लढवण्याची बंदी घालणे शक्य नाही !

परमबीर सिंह देशातच असून त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यास ते ४८ घंट्यांत समोर येतील ! – परमबीर सिंह यांच्या अधिवक्त्यांचा न्यायालयात दावा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह देशातच आहेत. ते पसार झालेले नाहीत. मुंबई पोलिसांकडून सिंह यांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळेच ते समोर येत नाहीत.

समान नागरी कायदा आवश्यक असून राज्यघटनेतील कलम ४४ ची कार्यवाही आवश्यक ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने, विविध उच्च न्यायालयांनी अनेकदा सुनावणींच्या वेळी देशात समान नागरी कायदा लागू करण्याविषयी सरकारला सल्ला दिला आहे; मात्र कोणत्याही सरकारने हा कायदा करण्याचा प्रयत्न केला नाही, हे लज्जास्पद !

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आहेत कुठे ? याची माहिती आम्हाला द्या !

‘तुमचा व्यवस्थेवर किती अविश्‍वास आहे ते पाहा. आम्ही त्यांना कोणतीही विशेष वागणूक देणार नाही. ते संरक्षण मागत आहेत. ‘न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यावरच ते प्रकट होतील’, असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?’ – सर्वोच्च न्यायालय