‘खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची यंत्रे झाली आहेत. रुग्णालये ही ‘रिअल इस्टेट’ (भूमी खरेदी-विक्री व्यवसाय) उद्योग बनत आहेत. रुग्णांना संकटकाळात साहाय्य करण्याऐवजी पैसे कमावणे, हे रुग्णालयांचे ध्येय झाले आहे. ‘लोकांचे प्राण संकटात टाकून रुग्णालयांची भरभराट होऊ देण्यास आम्ही अनुमती देऊ शकत नाही. त्याऐवजी रुग्णालये बंद केलेली बरी’, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने खासगी रुग्णालयांना फटकारले.’