६ डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण
मुंबई – खंडणीच्या आरोपावरून गुन्हा नोंद असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना मुंबईतील जिल्हा दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले होते; मात्र २५ नोव्हेंबर या दिवशी ते कांदिवली येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहिले. परमबीर सिंह यांनी सर्वाेच्च न्यायालयात मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगत त्यांच्यावरील गुन्ह्याची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर सर्वाेच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना ६ डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.