राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी अडचणी त्वरित दूर कराव्यात ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या आणि वन विभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ७ जानेवारी या दिवशी केली.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्रीरामजन्मभूमीला निधी अर्पण

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने श्रीरामजन्मभूमी निधी संकलन अभियानास अर्पण निधी म्हणून ११ सहस्र १११ रुपयांचा धनादेश देण्यात आला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. भिडेगुरुजी यांच्या वंदनीय उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

हेमंत नगराळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार

हेमंत नगराळे हे वर्ष १९८७ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांनी वर्ष १९९८ ते २००२ या कालावधीत केंद्रीय अन्वेषण यंत्रणेमध्येही काम केले. प्रारंभी मुंबई येथे, त्यानंतर देहली येथे उपमहासंचालकपदाचे दायित्व त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

शेळ-मेळावली येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून निषेध

शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा गोवा सुरक्षा मंचकडून ‘गोवा शासनाने या आंदोलकांविरुद्ध केलेली कृती अन्यायकारक आणि लोकशाहीविरोधी आहे’, या शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

आंदोलकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री शेळ-मेळावली येथे जाणार नाहीत ! – सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शेळ-मेळावली येथे नियोजित आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या ग्रामस्थांना भेटण्यासाठी जाणार नाहीत, अशी माहिती भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांना दिली.

आज गोवा विधानसभेत विधीमंडळ दिन : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू उपस्थित रहाणार

गोवामुक्तीच्या ६० व्या वर्षानिमित्त गोवा विधानसभा संकुलात ९ जानेवारीला दुपारी ४ वाजल्यापासून विधीमंडळ दिन साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमाला भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये २०० एकर जागेत भीषण आग

तालुक्यातील माडबन परिसरातील प्रस्तावित जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या परिसरामध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या भडकलेल्या आगीमध्ये २०० एकर जागेतील गवत जळून खाक झाले आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्‍न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आला आहे ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करावे, अशी मागणी आहे. यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी.

काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवर संभाजीनगर नावाचा वापर चालू !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय ट्विटरवर काँग्रेसच्या विरोधास आपण जुमानत नाही, हे दाखवून दिले आहे.

हुबळी येथे होत आहे जगातील सर्वांत मोठा रेल्वे फलाट; युद्धपातळीवर काम चालू

हुबळी रेल्वे फलाट जगातील सर्वांत अधिक लांबीचा फलाट होणार