अवेळी पावसामुळे विदर्भातील वातावरण गारठले


नागपूर, १८ फेब्रुवारी (वार्ता.) पूर्व विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याविषयी हवामान खात्याच्या अंदाजानुसार अनेक भागांत वार्‍यासह पावसाच्या सरी आल्या. काही ठिकाणी तुरळक गारपिटीमुळे संपूर्ण पूर्व विदर्भातील वातावरण गारठले आहे. या अवेळी पावसामुळे शेतपिकाची संभाव्य हानी टाळण्यासाठी सूचवलेल्या उपायामुळे साहाय्य झाल्याचे लक्षात आले.