राज्यपालांना सुबुद्धी मिळावी यासाठी महाबळेश्‍वर (जिल्हा सातारा) येथे शिवलिंगाला दुग्धाभिषेक


सातारा, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भगवान शंकराने सुबुद्धी द्यावी, यासाठी महाबळेश्‍वर (जिल्हा सातारा) येथील शिवसैनिकांनी महाबळेश्‍वर शिवलिंगाला दुग्धाभिषेक केला.

या वेळी शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, महाबळेश्‍वर शहरप्रमुख राजा गुजर, शहर संघटक नाना कदम, विभागप्रमुख अशोक ढेबे, महिला तालुकाप्रमुख वनिता जाधव, सरपंच सुनील बिरामणे, उपसरपंच सारिका पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.