Mumbai HC Slams Maha Govt : जर कायद्याद्वारे फेरीवाल्यांना हटवता येत नसेल, तर लोकांना कायदा हातात घेऊ द्या !

उच्च न्यायालयासमोर एक पोलीस चौकी आहे. तिथेच अवैध फेरीवाले आहेत, याकडेही बोट दाखवून खंडपिठाने खेद व्यक्त केला !

जत येथे विविध दाखल्यांसाठी अधिक शुल्क घेतल्यास नागरी सेतू केंद्राच्या चालकांवर कारवाई करणार ! – तहसीलदारांची चेतावणी

महा-इ-सेवा केंद्र आणि एकात्मिक नागरी सेतू सुविधा केंद्रातून अधिक पैशांची मागणी करणे हे प्रशासनास लज्जास्पद !

शक्तीपीठ महामार्ग रहित करण्यासाठी नागपूर-रत्नागिरी महामार्ग रोखणार !

‘रत्नागिरी-नागपूर शक्तीपीठ महामार्ग’ रहित करा आणि समर्थन करणार्‍या शेतकर्‍यांना किती मोबदला देणार आहे ? हे सरकारने घोषित केले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी १८ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी-नागपूर महामार्ग अंकली (तालुका मिरज) येथे रोखण्याचा निर्णय बाधित शेतकर्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला.

सांगली येथील शेरीनाल्याचे प्रदूषित पाणी त्वरित बंद करून शासनाचा ‘एस्.टी.पी.प्लांट’चा प्रकल्प मान्य करावा ! – नागरिक जागृती मंच

सांगली येथील कृष्णा नदीच्या पात्रात शेरीनाल्याचे प्रदूषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने शेरीनाल्याचे प्रदूषित पाणी त्वरित बंद करून शासनाचा प्रलंबित असलेला ‘एस्.टी.पी.प्लांट’चा प्रकल्प तात्काळ मान्य करावा, अशी मागणी ‘नागरिक जागृती मंच’ आणि सांगली शहरातील नागरिक यांनी केली आहे.

SC On Domestic Violence Act : महिलांकडून सूड उगवण्यासाठी होत आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग ! – सर्वोच्च न्यायालय

वैवाहिक वादातील कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग करण्याचे प्रकार चालूच रहातील, तसेच महिला आणि तिचे कुटुंबीय यांच्याकडून सासरच्यांवर दबाव टाकण्याच्या रणनीतीला बळ मिळेल.

Garland Gandhi wore on Dandi March : दांडी यात्रेत मोहनदास गांधी यांना घातलेल्या हाराला लंडनच्या लिलावात मिळाला नाही खरेदीदार !

यातून गांधी यांच्या विचारांची जादू आता उतरली आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

Andhra Pradesh : आंध्रप्रदेशमध्ये ‘नन’चे प्रशिक्षण घेणार्‍या ख्रिस्ती मुलीने कॉन्व्हेंटमध्ये बाळाला दिला जन्म !

जगभरात पाद्य्रांनी मुलांचे लैंगिक अत्याचार केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारतातही अशा घटना समोर येत आहेत; मात्र नेहमी हिंदु पुजारी आणि संत यांना ‘खलनायक’ रंगवण्यात मग्न असणारी प्रसारमाध्यमे अशा घटनांना प्रसिद्धी देत नाही, हे जाणा !

Places Of Worship Act : ‘पूजा स्थळ कायदा १९९१’ रहित करण्याविषयी केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

‘पूजा स्थळ कायदा १९९१’ (प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट १९९१) या कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी करतांना न्यायालयाने केंद्र सरकारला ४ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश दिला आहे.

हिंदु शौर्यदिनानिमित्त ‘इन्स्टाग्राम’वर पोस्ट प्रसारित करणार्‍या हिंदु तरुणावर धर्मांधांचे आक्रमण !

हिंदूबहुल महाराष्ट्रातील हिंदू आणखी किती काळ अशी आक्रमणे झेलत रहाणार आहेत ? सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !

Love Jihad : मुसलमानाने हिंदु तरुणीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकवून तिला ठार मारण्याचा केला प्रयत्न !

सामाजिक माध्यमांद्वारे हिंदु तरुणींशी स्वतः हिंदु असल्याचे सांगून ओळख करणार्‍या मुसलमानांचे प्रमाण सध्या वाढले आहे. याविषयी हिंदु तरुणी आणि त्यांचे पालक यांनी सतर्क रहाणे आवश्यक !